नेरळ गुन्हे प्रकटीकरण पथकाची दमदार कामगिरी, चोरी करणाऱ्या २ महिलांना ८ दिवसात बेड्या, नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक

नेरळ गुन्हे प्रकटीकरण पथकाची दमदार कामगिरी, चोरी करणाऱ्या २ महिलांना ८ दिवसात बेड्या, नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक

पुणे ( रफिक शेख ) : 1 तारखेला नेरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या मोहाचीवाडी येथे भांडी विक्रीसाठी आलेल्या २ महिलांनी समाधान चाळ आणि साईमंदीर परीसरातील सुमारे १८ ते २० महिलांची फसवणूक केल्याची घटना घडलीये. आमच्या घरातून सोन्या चांदीचे दागिने चोरले असल्याची तक्रार गावातील महिलांनी नेरळ पोलीस दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत नेरळ पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने 3 दिवसात या गुन्ह्याचा तपास लावत या दोन महिलांना बेड्या ठोकल्या आहेत. गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सचिन गावडे आणि त्यांच्या टीमने केलेल्या दमदार कामगिरीमुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. चोरी करणाऱ्या या महिलांच्या नावावर १३ गुन्हे दाखल असल्याचे या तपासात समोर आले आहे. नेरळ गुन्हे शाखेने या महिलांना ८ दिवसात अटक करून दमदार कामगिरी केली आहे. त्यांच्याकडून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांना १ वर्षाची शिक्षा आणि प्रत्येकी १८ हाजारांचा दंड ठोठावण्यात आलाय.

नवीन भांडे विक्री करणा-या या दोन महीलांनी जुन्या भांड्यांच्या बदल्यात नवीन भांडी देण्याचे सांगुन गावातील महीलांच्या सोने चांदीच्या दागिन्यांची चोरी केली. चोरी झालेल्या सामानाची एकूण किंमत १ लाख ६७ हजार ९०० रुपये इतकी असुन या महिलांकडून हा सर्व माल पोलिसांनी जप्त केला आहे.
या गुन्हयाचा तपास नेरळ गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सचीन गावडे आणि त्यांच्या टीमने केला आहे. सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत तसेच तांत्रीक पुरावे वापरून पोलिसांनी या महिलांचा शोध लावला आहे. २१ वर्षीय सुलेखा नयासाल मल्हार आणि ३६ वर्षीय सिमा श्यामसुंदर मल्हार अशी या महिलांची नावे आहेत. या महिला मध्यप्रदेश मधील असून त्या सध्या देहूरोड येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे नेरळ पोलिसांनी देहुरोड पुणे येथुन या महिलांना ताब्यात घेऊन अटक केले आहे. या महिलांनी आपणच गुन्हे केले असल्याची कबुली दिली असून गुन्हयातील फिर्यादी आणि साक्षीदार यांचा चोरीस गेलेला सर्व मुददेमाल देहुरोड येथुन हस्तगत करण्यात आला आहे. न्यायालयाने या महिलांना १ वर्षाचा कारावास आणि १८ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे आणि उपविभागीय पोलीस अधीकारी विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर, पोलीस उपनिरीक्षक सचीन गावडे, सहा.फौजदार गणेश गिरी, पोलीस हवालदार नवनाथ म्हात्रे, पोलीस नाईक संदीप चव्हाण यांनी हि कामगिरी पार पाडली आहे. या गुन्ह्याचा जलदगतीने तपास करून मुद्देमाल परत केल्याबद्दल फिर्यादी यांनी नेरळ पोलिसांचे आभार मानले आहेत.

About The Author