पुण्यातील भवानी पेठेतील ” समिर “च्या कब्जातून एक पिस्टल . दोन जीवंत काडतुस हस्तगत,
पुणे ( रफिक शेख ) : भवानी पेठेतीले ऐका तरणाला रॉबरी करण्याअगोदरच गुन्हे शाखायुनिट ६ ने करवाई करून ताब्यात घेतले आहे काल रात्री गुन्हे शाखा युनिट ६ कडील अधिकारी व अंमलदार हे हद्दी मध्ये गस्त करत असताना पोलीस नाईक सकटे यांना त्यांच्या बातमी दारामार्फत बातमी मिळाली की. वॉचमेकर चाळ भवानीपेठ पुणे येथे ऐका इसमाने रॉबरी करण्या करीता पिस्टल आणलेले आहे कायदेशिर कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याने सहाय्यक पोलीस निरिक्षक नरेंद्र पाटिल व पथक यांनी सापळा रचुन समीर प्रकाश कोतवाल. वय ३४ वर्ष रा. वॉचमेकर चाळ भवानीपेठ यास ताब्यात घेतले. समिरच्या कब्जा तुन एक जिवंत काडतुस हस्तगत करण्यात आले असुन त्याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने रॉबरी करण्याकरीता सदरचे पिस्टल आणल्याचे सांगितले त्याच्या विरूद्ध समर्थ पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट कलम ३(२५) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१). १३५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त पुणे शहर अमिताभ गुप्ता. पोलीस सह. आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे. अपर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा . श्रीनिवास घाडगे. सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे शहर . लक्ष्मण बोराटे यांचे मार्ग दर्शनाखाली गुन्हे शाखा. युनिट ६ चे पोलीस निरिक्षक गणेश माने. नरेंद्र पाटील. पोलीस उपनिरिक्षक सुधीर टेंगले . पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके. विठ्ठल खेडकर. नितीन मुंढे. कानिफनाथ कारखेले. नितीन शिंदे.
रमेश मेमाणे. बाळासाहेब सकटे . प्रतिक लाहिगुडे. वृषीकेश व्यवहारे . सचिन पवार. वृषीकेश टिळेकर. शेखर काटे . नितिन धाडगे. ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.