भारतरत्न डाॕ.बाबासाहेबांच्या विचारांचे आचरण करणे ही सर्वांची जबाबदारी – डॉ.संतोष मुंडे
परळी वैजनाथ ( गोविंद काळे) : भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून देशातील सर्वांना समान संधी, स्वातंत्र्य दिले आहे.संविधानाने स्वातंत्र्य, समता, बंधुभाव निर्माण केला आहे. त्यांच्या विचाराप्रमाणे आचरण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल.असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नाथ्रा येथे 30 जणांनी रक्तदान केले. विशेष महिलांनी रक्तदान करून अनोख्या पद्धतीने अभिवादन केले.
सोमवार, दि,६ डिसेंबर रोजी नाथ्रा येथे महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. तसेच धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष. डॉ. संतोष मुंडे व युवा नेते अभय मुंडे उपस्थित होते. यावेळी सुरेश मुंडे, श्रीहरी मुंडे आदी उपस्थित होते. महापरिनिर्वाणा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या शिबीरात अनेकांनी रक्तदान केले. यामध्ये महिला मंडळीनी ही रक्तदान केले. या रक्तदान शिबीरास युवकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दाखवून अनेक युवकांनी रक्तदान केले. यावेळी महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करून यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. डॉ. संतोष मुंडे म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर त्यांना खरी आदरांजली म्हणजे त्यांनी दिलेल्या विचारानुसार चालणे हे असून,तळागाळापर्यंत, जगातल्या अंधारा पर्यंत ज्ञानाचा प्रकाश पोहोचवणे,माणसा माणसाच्या मनातली जातीय विषमता, अंधश्रद्धा नष्ट करून,अज्ञानातून ज्ञानाकडे,अंधारातून प्रकाशाकडे नेणारी विचारप्रणाली आम्ही आत्मसात करावी हिच वंदनीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना खरी आदरांजली असेल अशा प्रकारचे उद्गार त्यांनी काढले. यावेळी संतराम किरवले, बाबासाहेब किरवले, सूनिल किरवले, अनिल किरवले, विकास तुपसमुद्रे, बाळू उपाडे, प्रकाश तुपसमुद्रे, ज्योतिनाथ उपाडे, शुभम घोरपडे, सिध्दार्थ पैठणे, सौरभ पैठणे, सुशिल घोरपडे, मुंजा मस्के, अक्षय हरबडे, नाना मुंडे, भिमराव किरवले, अभिमान किरवले, सुयोग किरवले, प्रतिक वाघमारे, समीर शैख, अनवर शेख, तसेच क्रांती मस्के, इंदुबाई हरबडे, विमलताई शिंदे, सविता किरवले, कविता पैठणे व नाथ्रा येथे अनेक मान्यवर उपस्थित होते.