डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क लातूरकर आंबेडकरी जनतेची अस्मिता

डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क लातूरकर आंबेडकरी जनतेची अस्मिता

लातूर (प्रतिनिधी) : डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क लातूर सदरील जागेचे सुशोभीकरण करा अशी आमची मागणी असताना याउलट मनपा प्रशासनाने व्यावसायिक बांधकाम करण्याचा घाट घातला आहे तो रद्द करण्यात यावा आणि छत्रपती शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळा तात्काळ बसवण्यात यावा या सह अन्य मागण्यासाठी बहिष्कृत हितकारिणी संघर्ष समिती लातूरच्या वतीने शहरातील शाहू चौक याठिकाणी 6 डिसेम्बर पासून बेमुद्दत आमरण उपोषण करण्यात आले असून अत्यंत जिव्हाळ्याचा विषय हाथी घेऊन सुरु करण्यात आलेल्या आंदोलनात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन समितीने केले आहे.

लातूर शहरातील डॉ.आंबेडकर पार्क व छ.शाहू महाराज पुतळा येथील समतावादी जनतेची ऊर्जाकेंद्रे आहेत, यावर मनुवादी विचार सरणीच्या राजकीय मंडळींनी घाला घालण्याचे षडयंत्र रचल्याचे दिसून येत आहे मागील अनेक वर्षांपासून डॉ.आंबेडकर पार्क आणि शाहू महाराजांचा पुतळा या संदर्भात अनेकवेळा मागण्या असताना सुद्दा यावर कोणतेही भाष्य न करता मनपा व्यावसायिक बांधकामाचा प्रयत्न करत आहे लातूर जिल्ह्यातील आंबेडकरी जनतेच्या भावनांचा विचार करून मनपा प्रशासन, पदाधिकारी यांनी सदर निर्णय पालिकेच्या सभागृहात ठराव घेऊन रद्द करावा या मागणी साठी 6 डिसेम्बर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर दिनाचे औचित्य साधून उपोषणाला सुरुवात केली असून यावेळी महेश गुंड, निलेश सिरसाट, निखिल गायकवाड, संदेश शिंदे, चिंटू गायकवाड, अक्षय धावरे, बबलू गवळे, बाबा ढगे, कार्तिक गायकवाड, बापू शेळके हे उपोषणास बसले आहेत या सामाजिक प्रश्नावर सुरूकरण्यात आलेल्या लढ्याला लातूरकरांनी साथ द्यावी असे आवाहन संयोजन समितीचे भैयासाहेब वाघमारे, मंगेश सोनकांबळे, राहुल कांबळे, सचिन लामतुरे, सचिन गायकवाड, आकाश इंगळे, सतीश करांडे, रवी कांबळे आदींनी केले आहे.

About The Author