नरपत सिंह राजपुरोहित यांचे हस्ते वृक्षारोपण
लातूर (प्रतिनिधी) : २७ जानेवारी २०१९ रोजी पर्यावरण रक्षणाचा संदेश देत भारत भ्रमण करणारा राजस्थान चा ३७ वर्षीय युवक नरपत सिंह राजपुरोहित यांनी दि. 9 डिसेंबर रोजी लातूर मध्ये येऊन ग्रीन लातूर वृक्ष टीमसोबत कृपासदन शाळा परिसरात ४२ मोठी पर्यावरण पूरक झाडे लावण्याचा उपक्रम केला आहे.
१०४६ दिवसांपासून २४००० किमी सायकल वर प्रवास करत ते देशभरात झाडे लावा, झाडे जगवा चा संदेश देत आहेत. राजस्थान ते काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यत सायकल वर प्रवास करून आता ते महाराष्ट्र मार्गे गुजरात द्वारे परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. प्रवासादरम्यान ते आजुबाजुचे शेतकरी, गावकरी, शाळा महाविद्यालये, सरकारी कार्यालये येथे पर्यावरणाबद्दल जनजागृती करतात. मनुष्याने आयुष्यात दोन तरी झाडे लावावी, कारण मनुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यत झाडे सोबत असतात असे ते म्हणाले.
ग्रीन लातूर वृक्ष टीमचा ९२० व्या दिवसाच्या वृक्षारोपणाचा उपक्रम पूर्ण करण्यासाठी डॉ. पवन लड्डा, संतोष बालगीर, डॉ. भास्करराव बोरगावकर, पद्माकर बागल, सुलेखा कारेपुरकर, आशा अयाचित, सूरज साखरे, कांत मरकड, दयाराम सुडे, भगवान जाभाडे, कपिल काळे, विमल रेड्डी, विजयकुमार कठारे, तेजस मुंडे, अभिजित चिल्लरगे यांनी परिश्रम घेतले. ग्रीन लातूर वृक्ष टिम सदस्यांनी त्यांचे यथोचित स्वागत, सत्कार करुन त्यांना पुढील प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या.