चंपाषष्ठी महोत्सवानिमित्ताने तपसेचिंचोली येथे रक्तदान शिबीर संपन्न
औसा (प्रतिनिधी) : शिवसृष्टी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लातूर द्वारा संचलित संजीवनी रक्तपेढी व खंडोबा देवस्थान तपसेचिंचोली यांच्या संयुक्त विद्यमानाने खंडोबा यात्रा चंपाषष्ठी महोत्सवानिमित्ताने तपसेचिंचोली येथील खंडोबा मंदिरात 8 डिसेंबर रोजी रक्तदान शिबिर संपन्न झाले. या रक्तदान शिबिरात 20 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी गावचे सरपंच विश्वंभर सुरवसे, उपसरपंच युवराज यादव, शिवशंकर पाटील, ग्रामपंचायत सदस्य नितीन कवठाळे, राजेश पाटील, प्रमोद नेटके, सचिन गरड, गणेश नेटके, प्रशांत कुलकर्णी, खंडू नेटके, परमेश्वर शिंदे उपस्थित होते.
रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी संजीवनी ब्लड बँकेचे संचालक बालाजी जाधव, रक्त संक्रमण अधिकारी डॉ माधव झिल्ले, तंत्रज्ञ मेघा येडके, श्रीदेवी कांबळे, माधुरी टेकाळी, मंदाकिनी महापुरे, अपेक्षा गायकवाड, विक्रम चव्हाण, महादेव बंडगर, पत्रकार प्रशांत नेटके, आदींनी सहकार्य केले.