अहमदपूर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने भव्य खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

अहमदपूर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने भव्य खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

अहमदपूर (गोविंद काळे) : मा.खा.शरदचंद्रजी पवार साहेब,(माजी राज्यमंत्री)बाळासाहेब जाधव साहेब,आमदार बाबासाहेब पाटील,यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा 12 डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता मांडणी ते चंद्रभागानगर अहमदपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 11,111 रुपये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अहमदपुर तालुका अध्यक्ष दयानंद पाटील यांच्या वतीने, तर द्वितीय पारितोषिक 8,111 रुपये युवा नेते अहमदपुर येथील युवा नेते सय्यद इलियास, तर तृतीय पारितोषक 5,111 रुपये माजी सभापती शिवाजीराव खांडेकर, तर चतुर्थ पारितोषिक 2,111 रूपये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अहमदपुर शहराध्यक्ष अजहर सय्यद यांच्या वतीने देण्यात येणार आहे. तसेच या मॅरेथॉन स्पर्धेसाठी अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवानंद तात्या हेंगणे, राष्ट्रवादीचे अहमदपुर तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, जिल्हा परिषदे सदस्य माधवराव जाधव, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष मीनाक्षीताई शिंगडे, युवा नेते नागेश महाजन जावेद बागवान, रविकुमार तुपकर,यांनी या मॅरेथॉन स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केले आहे. या मॅरेथॉन स्पर्धेसाठी 100 रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात आले असून सदरील प्रवेश फी व नाव नोंदणी 11 डिसेंबर पर्यंत करावे तसेच या स्पर्धेत अहमदपुर तालुक्यातील जास्तीत जास्त युवकांनी व युवतींनी सहभाग नोंदवावा असे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस लातूर जिल्हा उपाध्यक्ष संग्राम पवार ,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष विनायक शिंदे पाटील, ता.सरचिटणीस अतुल पाटील, शहर अध्यक्ष आकाश भालेराव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

About The Author

error: Content is protected !!