फुले महाविद्यालयात एन. एस. एस. नवप्रवेशितांची कार्यशाळा संपन्न

फुले महाविद्यालयात एन. एस. एस. नवप्रवेशितांची कार्यशाळा संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना ( एन.एस.एस. ) विभागाच्या वतीने नव प्रवेशित विद्यार्थी कार्यशाळा ७ डिसेंबर रोजी महात्मा फुले सभागृहात संपन्न झाली. या बाबतचे सविस्तर वृत्त असे की, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नव प्रवेशित विद्यार्थी कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील होते तर उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी व एन. एस. एस. चे सल्लागार समिती सदस्य तथा हिंदी विभागप्रमुख प्रो. डॉ. नागराजमुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांना एन.एस.एस. डायरीचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तर प्रो. डॉ. नागराज मुळे यांनी व उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी विद्यार्थ्यांना येथोचित मार्गदर्शन केले. तसेच कार्यशाळेचा अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केला. या कार्यशाळेचे प्रास्ताविक तथा सूत्रसंचलन कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले तर आभार क्रीडा संचालक प्रो. डॉ. अभिजीत मोरे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी ‘कोविड-१९’ च्या नियमांचे पालन करून उपस्थित होते.

About The Author