माजी राज्यमंत्री जाधव साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन

माजी राज्यमंत्री जाधव साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन

अहमदपूर (गोविंद काळे) : आमदार बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत गोताळा ता.अहमदपूर येथे माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत भोसले व सुनेगाव (शेंद्री) शेनी या गावच्या सरपंच उषा जायभाये यांचे पती गोपीनाथ जायभाये यांच्या संकल्पनेतून ऊस तोड कामगारांना ब्लँकेट वाटप तसेच जावेदभाई बागवान यांच्या संकल्पनेतून सुखमनी वृद्धाश्रमात फळ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित राहून ऊसतोड कामगारांना ब्लँकेट वाटप केले. तसेच फळ वाटप केले. हिवाळ्यात थंडी पासून संरक्षण व्हावे आणि त्यांना मायेची ऊब देण्याचा प्रयत्न म्हणून हा उपक्रम आयोजित करण्यात आला. स्तुत्य असा उपक्रम राबविल्याबद्दल आयोजकांचे कौतुक करत आमदार बाबासाहेब पाटील यांनी आभार मानले. तसेच हजरत सय्यद अमीर अली दर्गा टेंभी पाटी येथे दर्गा देवस्थान चादर चढवत माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांना निरोगी उदंड आयुष्य लाभो अशी ही प्रार्थना केली.

यावेळी राष्ट्रवादी ता.अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, मुकुंदराव देशमुख, शेतकी अधिकारी पी.एल मिटकर, राष्ट्रवादी युवक जिल्हा कार्यध्यक्ष प्रशांत भोसले, गोपीनाथ जायभाये, शरद चवंडा, राजकुमार रेड्डी,प्रशांत भोसले, शहराध्यक्ष अझहरभाई बागवान, शादुल पठाण सर,चंद्रशेखर भालेराव, माजी सभापती शिवाजीराव खांडेकर, बाबूभाई रुईकर, इलाही बागवान, गोलंदाज भाई, प्रवीण देशमुख, यशवंतराव टाळे, भाकरे, येदले ऊस पुरवठा अधिकारी गट पुरवठा अधिकारी ज्ञानेश्वर डावळे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब बेडदे, नितीन गोरे, मुसने, जयंत देशमुख, टाळे साहेब, गुळवे दयानंद, डावळे, अभय मिरकले, प्रशांत भोसले, इलियास सय्यद, महेश देवणे, डॉ.फुजेल जहागिरदार, जावेद बागवान, अफरोज शेख, फेरोज शेख, पाशा मेजर, अशोक सोनकांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!