भाजयुमोकडून शहीद शूरविरांना भावपूर्ण श्रध्दांजली

भाजयुमोकडून शहीद शूरविरांना भावपूर्ण श्रध्दांजली

लातूर (प्रतिनिधी) : भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दूर्दैवी अपघातात भारतीय सैन्य दलातील 11 कर्तबगार अधिकार्‍यांना आपला जीव गमवावा लागला. या अपघातामुळे देशाची कधी भरून न निघणारी हाणी झालेली आहे. या दुर्घटनेत शहीद झालेले भारत देशाचे पहिले सी.डी.एस.स्व.विपीनजी रावत यांच्या पत्नी स्व.मधुलिका रावत व शहीद झालेले सैन्य दलातील शूरवीर 11 अधिकार्‍यांना भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहर जिल्ह्याच्यावतीने क्रीडा संकूल येथील अमर जवान स्मारक परिसरात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, सरचिटणीस अ‍ॅड.गणेश गोजमगुंडे, सागर घोडके, यशवंत कदम, आकाश बजाज, उपाध्यक्ष गजेंद्र बोकण, अ‍ॅड.प्रकाश काळे, वैभव डोंगरे, चैतन्य फिस्के, अ‍ॅड.पंकज देशपांडे, राजेश पवार, ईश्‍वर सातपूते, रवी लवटे, मंदार कुलकर्णी, आकाश जाधव, गोविंद सूर्यवशीं, महादेव पिटले, राजेश्री होणाळे, पांडुरंग बोडके, काकासाहेब चौगुले, आशिष बोंडगे यांच्यासह भारतीय जनता पार्टी युवा मोर्च्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“वीर जवान अमर रहे” च्या
घोषणेत शहीदांना श्रध्दांजली
भारतीय जनता पार्टी युवा मोर्च्याच्यावतीने “वीर जवान अमर रहे” अशा घोषणा अशा करून या हेलीकॅप्टर दूर्घटनेत शहीद झालेल्या वीर जवानांच्या आत्म्यास शांती लाभो त्यांच्या कुटुंबियांना या दूःखातून सावरण्याची शक्‍ती परमेश्‍वर देवो अशी प्रार्थना करून दोन मिनीटे स्तब्ध राहून शहीदांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

About The Author