व्यसनाधीन समाज कधीही प्रगती करू शकत नाही..!

व्यसनाधीन समाज कधीही प्रगती करू शकत नाही..!

कुलगूरू डाॅ.उध्दवराव भोसले यांचे प्रतिपादन
व्यसनमुक्ती काळाची गरज’ या विषयावरील पुस्तकाचे प्रकाशन

नांदेड (गोविंद काळे) : सम्यक समता प्रकाशनाच्या वतीने काढण्यात आलेल्या ‘व्यसनमुक्ती काळाची गरज’ या पुस्तकाचे प्रकाशन नूकतेच नांदेड येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगूरू डाॅ.उध्दवराव भोसले सर यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रत्येक वर्षी समाजातील एका ज्वलंत प्रश्नावर विचार मंथन होण्याच्या दृष्टिकोनातून सम्यक समता परिवाराकडून विशेषांक तयार करण्यात येत असून या पूर्वीच्या पुस्तकांना लातूर पत्रकार संघाचे पुरस्कार मिळालेले आहेत.यावर्षी ‘व्यसनमुक्ती काळाची गरज’ या विषयावर पुस्तक तयार केले असल्याचे पुस्तकाचे संपादक प्रा. डाॅ. सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी प्रास्तविकात सांगीतले.

या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी बोलताना कुलगूरू डाॅ.भोसले सर म्हणाले की,दिवसेंदिवस तरूणाई ही व्यसनाकडे वळत असल्याचे चित्र चौफेर पहावयास मिळत असून ही बाब अतिशय चिंतेची आहे.प्रत्येक व्यक्तींनी आपल्या मनावर नियंत्रण ठेवून आपल्या व परिवाराच्या उज्ज्वल जीवनासाठी व्यसनमूक्त राहीले पाहीजे.विशेषतः तरूणांनी व्यसनमूक्तीच्या दिशेने कार्य केले पाहीजे तरच आपण प्रगती करू शकतो.कारण व्यसनाधीन सभाज कधीही प्रगती करू शकत नाही. व्यसनमूक्तीची चळवळ वृध्दींगत करण्यासाठी सदरचे पुस्तक हे निश्चीतच दिशादर्शक ठरेल असा विश्वास वाटतो.एका महत्वाच्या समस्येवर प्रकाश टाकणारे हे पुस्तक असून या पुस्तकाचे संपादक आणी त्यांच्या सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन करतो असे प्रतिपादन केले.

या वेळी सम्यक समताचे संपादक डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी,जेष्ठ विचारवंत प्रा.डाॅ.नारायणराव कांबळे सर,कार्यकारी सभापती प्रशांत जाभाडे, प्रा.डाॅ.प्रदीप देशमुख, पत्रकार अजय भालेराव आदींची उपस्थिती होती.

About The Author