स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड व शिवप्रेमी समुहाच्या वतीने कानडी सरकारचा निषेध

स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड व शिवप्रेमी समुहाच्या वतीने कानडी सरकारचा निषेध

अहमदपूर (गोविंद काळे) : सबंध महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांची विटंबना करणार्‍या कानडी सरकारचा पत्रकाची होळी करून अहमदपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड व शिवप्रेमी लातुर समुहाच्या वतीने
कानडी सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हटाओ लुंगी बजाव पुंगी, कान्नडी सरकारचा जाहीर निषेध अशा घोषणा देत कानडी सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. छत्रपती शिवराय अख्या विश्वाचे आराध्य दैवत आहेत, त्यांचा अपमान महाराष्ट्रातील शिवप्रेमी कधीच खपून घेणार नाही व येणार्‍या काळात अशी दुर्दैवी घटना घडली तर संबंधितांचे हातपाय तोडल्याशिवाय महाराष्ट्रातील शिवप्रेमी शांत बसणार नाहीत, अशा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड प्रदेश कोषाध्यक्ष गजानन भाऊ माने शिवसेना शहर अध्यक्ष लक्ष्मण आलगुले व रामप्रसाद आया एकता ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सांवन भाऊ कदम स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष बळी पाटील तसेच स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष लातूर ग्रामीण बाळासाहेब कदम जिल्हा उपाध्यक्ष जनार्धन भालेराव जिल्हा कार्याध्यक्ष विठ्ठल मुळे राष्ट्रवादी युवा नेते जावेद भाई बागवान तालुका अध्यक्ष व्यंकटराव कदम सर्व शिवप्रेमी कार्यकर्ते बांधव उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!