महात्मा फुले महाविद्यालयात गाडगेबाबांना अभिवादन

महात्मा फुले महाविद्यालयात गाडगेबाबांना अभिवादन

अहमदपूर (गोविंद काळे) : शिक्षण, समता, सामाजिक न्याय, वैज्ञानिक जाणिवा आणि स्वच्छतेचे महत्त्व समाजाच्या सर्व थरांतील लोकांना पटवून देण्यासाठी आयुष्य पणाला लावणारे थोर राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना येथील महात्मा फुले महाविद्यालयात विनम्र अभिवादन करण्यात आले. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होत तर उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.बब्रुवान मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. मारोती कसाब यांनी केले. यावेळी कोविड-१९ च्या नियमांचे पालन करून प्राध्यापक, व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!