कृष्णा महाराज कुलकर्णी यांना “लातूर भुषण पुरस्कार” प्रदान

कृष्णा महाराज कुलकर्णी यांना "लातूर भुषण पुरस्कार" प्रदान

लातूर (प्रतिनिधी) : लातूर महानगरपालिका पालिकेचे माजी नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती गिरीश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेञात विशेष कार्य करणार्या व्यक्तींना सोमवारी दि. २० डिसेंबर रोजी लातूर भुषण पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्यामध्ये लातूरचे वारकरी संप्रदायाचा वारसा चालवणारे व वारकरी संप्रदायीक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे मृदंग वादक व गायक ह.भ.प.कृष्णा महाराज कुलकर्णी यांना विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष परमपूज्य ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते लातूर भुषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी गिरीश पाटील वसुंधरा प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा.योगेश शर्मा, अजितदादा चिखलीकर, अमर पाटील, किरण जाधव, उपस्थित होते. त्यांना हा पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचे सर्वञ कौतुक केले जात आहे.

About The Author

error: Content is protected !!