रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान, लातूर विभागाच्या वतीने शिराळा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास दुग्ध अभिषेक

रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान, लातूर विभागाच्या वतीने शिराळा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास दुग्ध अभिषेक

लातूर (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम हिंदुस्थानचे आराध्य दैवत असून या दैवताची कर्नाटक राज्यातील सदाशीवनगर याठिकाणी झालेल्या महाराजांच्या स्मारकाच्या विटंबनेच्या निषेध म्हणून रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या संस्थापक अध्यक्षा, अश्विनीताई महांगडे व कार्याध्यक्ष निलेशबाबा जगदाळे यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान, लातूर विभागाच्या वतीने लातूर तालुक्यातील शिराळा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घालण्यात आला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.त्यावेळी जय जिजाऊ जय शिवराय च्या घोषणा देण्यात आल्या.अशाप्रकारे जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे राज्यसंघटक श्री ज्ञानेश्वर दादा काळे, लातूर जिल्हा समन्वयक राहुल मोहिते-पाटील सदस्य लक्ष्मण आतकरे, लक्ष्मण इंगळे, ज्ञानेश्वर काळे (माऊली), आकाश माळी ,खंडू पवार, मयूर करदुरे, राहुल गव्हाणे, अविनाश काळे, संभाजी काळे, विष्णु देशमुख, विकास माळी, चेतन काळे, रणजित काळे, योगेश काळे, रवी काळे, गणेश काळे, शंकर काळे , अश्रुबा काळे, अनिल काटे, संदीपान काळे, धनंजय जाधव, बाजीराव काटे, शिवाजी गव्हाणे, योगेश काळे, श्रीकांत काळे, प्रफुल्ल काळे, लक्षवेध टीम, रामप्रसाद बर्डे , रंगनाथ माने व समस्त शिराळा ग्रामस्थ उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!