विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याचे एकाच दिवसात विक्रमी गाळप
लातूर (प्रतिनिधी) : देशात साखर कारखानदारीत पाहिल्या स्थानावर असलेल्या लातूर येथील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना विलासनगर ने चालु गळीत हंगामात २०२१- २२ मध्ये २० डिसेंबर रोजी एकाच दिवशी ५,८४० मेट्रिक टन उसाचे गाळप करून यापूर्वी उच्चांकी गळीतांचे स्थापित केलेले आदर्श ओलांडून नवीन मांजरा साखर कारखान्यात नवीन उच्चांक पॅटर्न निर्माण केला आहे लोकनेते विलासराव देशमुख यांनी घालुन दिलेल्या पाऊल वाटेवर कारखान्याची वाटचाल सुरू आहे कारखान्याचे चेअरमन माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब , पालकमंत्री ना अमित विलासराव देशमुख, आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे कारखान्याची वाटचाल सुरू आहे.
मांजरा साखर कारखान्या च्या चालु गळीप हंगामात कारखाना कार्यक्षेत्रात २१,१३९.४० हे. क्षेत्रात उच्चांकी उसाची नोंद झालेली असून उपलब्ध असलेल्या संपूर्ण उसाचे गाळप चालु हंगामात करण्यासाठी कारखाना व्यवस्थापनाने नियोजन पुर्वक बंद हंगामात यंत्र सामुग्री ची आवश्यक देखभाल दुरुस्तीची देखभाल करून घेतली होती त्याचाच परिणाम म्हणून गाळपा च्या ४० व्या दिवशी तब्बल ५.८४० मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे आतापर्यंत चालु गळी प हंगामात १.६८.००० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून १, ७०,३०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे तर सरासरी साखरेचा उतारा १०.३२ टक्के आलेला आहे.
साखर कारखान्याकडे १८ मेगावॉट वीजनिर्मिती
साखर कारखान्याकडे असलेल्या १८ मेगावॉट वीज निर्मिती प्रकल्पा कडे उत्पादित झालेली वीज कारखाना उपयोगात आणून उर्वरित शिल्लक राहिलेल्या विजेचे ७९,७२ ,००० युनिट्स महारष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीस एक्सपोर्ट करण्यात आले आहे तर कारखाना अर्क शाळेकडे १७.४५,४३३.० लिटर्स अल्कोहोल व १०.११,९३६.० लिटर्स इथेनॉल चे उत्पादन झालेले आहे तयार झालेले इथेनॉल ऑईल कंपन्याचे डेपोस पुरवठा करण्यात येत आहे.
कारखान्याच्या यशस्वीतेसाठी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, कार्यकारी अधिकारी जितेंद्र रनवरे, सन्माननीय संचालक मंडळ व्यवस्थापन,अधिकारी, कर्मचारी, कामगार, उस तोडणी व वाहतूक ठेकेदार व मजूर अहोरात्र प्रयत्नशील आहेत यावर्षीचा उस गाळप हंगाम यशस्वीपणे कार्यरत असल्याने कारखाना ऊस उत्पादका मध्ये आनंदाचे समाधानाचे वातावरण पसरले आहे.
