लातूरच्या दोन कलावंतांना कलारत्न पुरस्कार प्रदान

लातूरच्या दोन कलावंतांना कलारत्न पुरस्कार प्रदान

पुणे/लातूर (प्रतिनिधी) : २४ डिसेंबर रोजी पुणे येथे टिळक स्मारक मंदिर येथे मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी आयोजित राज्यस्तरीय गुणीजन गौरव महापरिषद २०२१ मार्फत दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल कलारत्न पुरस्कार २०२१ लातूरच्या मातीतील दोन उत्कृष्ट कलाकार ज्यानी अगदी कमी वयात तबला वादनात अवघ्या महाराष्ट्राला वेड लावल चि.विशाल सोमवंशी आणि वारकरी संप्रदायाचा वारसा चालवणारे उत्कृष्ट गायक आणि वादक ह.भ.प.कृष्णा महाराज कुलकर्णी या दोघांना आज राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल कलारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना हा पुरस्कार ह.भ.प.श्यामसुंदर महाराज सोन्नर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. लातूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला त्याबद्दल त्यांचे सर्वञ कौतुक केले जात आहे. पुरस्कारा नंतर कृष्णा कुलकर्णी यांनी हा पुरस्कार मी आपल्या आई वडिलांच्या चरणी आणि सर्व गुरूवर्यांच्या चरणी अर्पण करतो असे त्यांनी सांगितले.

About The Author

error: Content is protected !!