लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अँड. किरण जाधव यांच्या हस्ते लातूर शहरातील प्रभाग 13 मधील संजय गांधी निराधार योजना समाधान शिबिराचा शुभारंभ
लातूर (प्रतिनिधी) : राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार लातूर शहरातील दिव्यांग, निराधार, विधवा व इतर पात्र व्यक्तींना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रत्येक प्रभागात समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. आत्तापर्यंत १२ प्रभागात समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व शिबिराला दिवसेंदिवस पात्र लाभार्थ्यांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. शनिवार दिनांक २५ डिसेंबर रोजी सकाळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव यांच्या हस्ते लातूर शहरातील प्रभाग क्रमांक १३ मधील संभाजी नगर खाडगाव रोड परिसरातील लोकसेवा डी.एड कॉलेज येथे संजय गांधी निराधार योजना समाधान शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी लातूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य समद पटेल, संजय गांधी निराधार योजना समिती लातूर शहरचे चेअरमन हकीम शेख,नगरसेवक पप्पू देशमुख, सोपान घोडके गुरुजी आदीसह काँग्रेस पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते, संजय गांधी निराधार योजना समितीचे सर्व सदस्य, सर्व बुथप्रमुख ,निराधार महिला ,पुरुष परिसरातील नागरिक उपस्थित होते.
यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड.किरण जाधव म्हणाले की, मागच्या दोन महिन्यापासून संजय गांधी निराधार योजना समितीचे समाधान शिबिराचे आयोजन लातूर शहरातील प्रत्येक प्रभागात करण्यात येत आहे राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार या योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्याला घरापर्यंत जाऊन देण्यात येत आहे. त्यांचे तहसीलचे हेलपाटे मानसिक त्रास यातून दूर झाला आहे. लातुरात आत्तापर्यंत १२ प्रभागात संजय गांधी निराधार योजना समितीचे समाधान शिबिर झाले आहेत. कुठलाही मोबदला न घेता लाभ देण्यात येत आहे जन्मदात्या आई वडीलांना मुले सांभाळायला तयार नाहीत. आज पालकमंत्री ना.अमित देशमुख हे श्रावण बाळाची भूमिका निभावत आहेत. या योजनेपासून कोणीही वंचित राहू नये या योजनेचा लाभ मिळण्यापासून भारतीय नागरिक म्हणून पात्र जबाबदार नागरिकांनी सर्व योग्य कागदपत्रे देऊन या योजनेचा लाभ घ्यावा. काही अडचण असेल तर त्याची सोडवणूक याच ठिकाणी होईल. पुढे बोलताना ते म्हणाले की, सर्वांनी लसीकरण करून घ्यावे कोरोना विषयक नियमांचे पालन करावे कोरोना काळात लातूरात पालकमंत्री ना.अमित देशमुख यांनी चांगल्या सुविधा मिळवुन दिल्या असून सर्व टीम चांगले काम करत आहे असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना दत्ता सोमवंशी म्हणाले की, राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार हे शिबिर होत आहे. लातूर शहरातील प्रत्येक प्रभागात संजय गांधी निराधार योजना समितीचे समाधान शिबिर होत आहे. तळागाळातील नागरिक, दिव्यांग व्यक्ती, विधवा महिला यांच्यापर्यंत या योजना पोहोचवण्यासाठी सर्व काँग्रेस पदाधिकारी नगरसेवक काम करत आहेत. ६५ वर्षावरील निराधारांना तहसीलला चकरा मारणे शक्य होत नाही त्यामुळे खरा लाभार्थी यापासून वंचित राहू नये म्हणून या समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. विधवा, निराधार यांना पूर्वी बँक अकाउंट साठी पैसे लागायचे खात्यावर बॅलन्स ठेवावा लागायचा पण आता माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या सूचनेनुसार लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत 0 रुपयांमध्ये बँक खाते काढून दिले जात आसल्याचे सांगत या योजनेचा निराधारानी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहनहि त्यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद केंद्रे यांनी केले तर शेवटी आभार नागसेन कामेगावकर यांनी मानले.
या प्रसंगी अल्पसंख्यांक काँग्रेसचे एड. फारुख शेख, लोकसेवा डीएड कॉलेजचे जुनेद शेख, नगरसेविका योजना कामेगावकर, कमलताई सोमवंशी, नगरसेवक आयुब मणियार, नागसेन कामेगावकर, दत्ता सोमवंशी, प्रभाग समन्वयक धनंजय शेळके, सचिन गंगावणे, समितीचे सदस्य दगडूआप्पा मिटकरी, भालचंद्र सोनकांबळे, बंडू सोलंकर, राजू चिंताले, मनोज देशमुख, अमोल माने, नागेश जोगदंड, मिलिंद घनगावे, विजय गायकवाड, मुक्रम सय्यद, प्रशांत कामेगावकर, सचिन कराळे, हुसेन शेख, युनुस शेख ,सचिन चरक, गौस सय्यद, बापू गायकवाड, कैफ काजी, हमजा पटेल, फरीद शेख ,कुणाल श्रंगारे, महम्मद बिलाल, आकाश मगर ,कुणाल वांगज, हमीद शेख, मनोज मुखेडकर, सोनू सोमवंशी, लक्ष्मीकांत पाटील, अँड. देविदास बोरुळे पाटील, अब्दुल्ला शेख,कार्यालयीन प्रभाग समन्वयक राजकुमार भोसले आदी उपस्थित होते.
चौकट – संजय गांधी निराधार योजना समाधान शिबिराच्या ठिकाणी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सर्व नागरिकांसाठी लातूर महानगरपालिकेच्या वतीने कोरोना लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली यावेळी परिसरातील नागरिकांनी लस घेतली.