मुख्याध्यापक सोनाजी भंडारे यांना ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ जाहिर

मुख्याध्यापक सोनाजी भंडारे यांना 'राजर्षी शाहू पुरस्कार' जाहिर

लातूर (प्रतिनिधी) : लातूर येथील राजर्षी शाहू प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा जिल्हास्तरीय राजर्षी शाहू गुणवंत शिक्षक पुरस्कार यावर्षी नांदगाव ता.लातूर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे कर्तव्यदक्ष, विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक सोनाजी भंडारे यांना जाहीर झाला असल्याचे निवडपत्र प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अप्पाराव शिंदे यांनी एका छोटेखानी कार्यक्रमात विजयकुमार गुत्ते, पांडुरंग पवार, राजेश शिंदे, बालाजी कोळी, नजीऊल्ला शेख यांच्या उपस्थितीत नांदगाव चे मुख्याध्यापक सोनाजी भंडारे यांना दिले.

त्यांच्या या पुरस्कार निवडीबद्दल शाळेत परिपाठावेळी विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या वतीने त्यांचा शाल,श्रीफळ व पुष्पहार देवून यथोचित सन्मान करुन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक ९ जानेवारी २०२२ रोजी औसारोड येथील थोरमोटे पाटिल लाॅन्स येथे एका भव्य कार्यक्रमात सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या शुभहस्ते पार पडणार असल्याने या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शाळेतील उपक्रमशिल शिक्षक तथा बालरक्षक नजीऊल्ला शेख, यांनी केले तर आभार भक्ती साळुंके यांनी मानले. यावेळी कवयित्री छाया कांबळे, अनारकली शेख, प्रणिता नवगिरे, दिव्या उदारे, सविता जगताप, गोपाळ मुळे यांच्यासह शिक्षक विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

About The Author