राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होतो – डॉ. गणपत मोरे
दयानंद कला महाविद्यालय विभागीय रासेयो कार्यक्रम अधिकारी बैठक संपन्न
लातूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय योजनेच्या विविध कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. तसेच सामाजिक व राष्ट्रीय जाणिवा निर्माण होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनाचा उपयोग होतो.” असे प्रतिपादन विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ.गणपत मोरे यांनी व्यक्त केले. ते दयानंद कला महाविद्यालयात आयोजित लातूर उस्मानाबाद व नांदेड जिल्ह्यातील विभागस्तर रासेयो कार्यक्रम अधिकारी बैठकीत बोलत होते. पुढे ते म्हणाले की,”महात्मा गांधीजींच्या स्वप्नातला भारत साकारण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी हे कटिबद्ध असतात. कार्यक्रम अधिकाऱ्यांनी अशा विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व सामाजिक जाणीव प्रगल्भ करण्यासाठी मदत करावी.
याप्रसंगी सहायक शिक्षण संचालक वंदना फुटाणे म्हणाल्या की,” राष्ट्रीय सेवा योजनेतुन माणूस घडविण्याचे कार्य केले जाते. त्यामुळे येणाऱ्या काळात महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे युनिट सुरू करणार आहोत.
प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड म्हणाले की,” दयानंद कला महाविद्यालयातून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यां स्वतःच्या पायावर उभे राहिले.त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला”
कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका विभागीय समन्वयक डॉ संदीपान जगदाळे यांनी विशद केली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विजय गवळी यांनी केले आभार प्रदर्शन प्रा. विलास कोमवाड यांनी व्यक्त केले. नांदेड जिल्ह्याचे रासेयो समन्वयक प्रा. मारुती हनमंतकर, डॉ. अंजली भगवानकर, प्रा.देविदास घोडके यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उस्मानाबाद जिल्ह्याचे रासेयो समन्वयक प्रा.मोहन राठोड, प्रा. सुरेश क्षीरसागर, बाळकृष्ण अडसूळ यांनी परिश्रम घेतले.