महात्मा फुले महाविद्यालयात ‘विद्यार्थी प्रबोधन पंधरवडा’ चे आयोजन
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयामध्ये आभासी तथा दूरदृश्य (झूम ) प्रणालीच्या माध्यमातून प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नाविन्यपूर्ण अशी विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांसाठी ‘विद्यार्थी प्रबोधन पंधरवडा मालिकेचे ‘ आयोजन करण्यात आले आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, ‘कोविड-१९’चा प्रादुर्भाव असल्यामुळे विविध विषयाच्या नामांकित तज्ज्ञ प्राध्यापकांना निमंत्रित करून ‘विद्यार्थी प्रबोधन पंधरवडा’ या मालिकेमध्ये (झूम प्रणाली द्वारे ) अभासी तथा दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, यासह इतर विषय आणि क्रीडा विभाग व एनएसएस विभागाच्या माध्यमातून व्याख्यानमाला विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली असून या व्याख्यानमालेचा लाभ विद्यार्थ्यांनी व संबंधितांनी घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील व व्याख्यानमालेचे संयोजक उपप्राचार्य डॉ. डी. डी. चौधरी, संगणक तज्ज्ञ ग्रंथपाल पी.एम.इंगळे यांनी केले आहे.