गौर ग्रामपंचायतीवर गौर ग्रामविकास पॅनलची एकहाती सत्ता
दुरंगी लढत : 11 पैकी 11 जागा जिंकून हॅट्रिक करणारी गौर ग्रामपंचायत
लातूर (प्रतिनिधी) : निलंगा तालुक्यातील गौर ग्रामपंचातीअंतर्गत भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते रोहित विठ्ठलराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली गौर ग्रामविकास पॅनल व विरोधी पॅनलमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत 11 पैकी 11 जागा जिंकून गौर ग्रामविकास पॅनलने एकदा नव्हे दोनदा नव्हे तर तब्बल तिसर्यांदा एकहाती सत्ता मिळवून हॅट्रिक साधली असल्याने या पॅनलच्या विजयी उमेदवारांचे ग्रामस्थातून सर्वत्र कौतुक होत आहे.
माजी कॅबीनेट मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर, भाजपा नेते माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर व छोटू भैय्या उर्फ अरविंद पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रोहित पाटील यांनी गौर ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून 11 उमेदवार उभे केले. यामध्ये गौर ग्रामविकास पॅनल व विरोधी पॅनल यांच्यामध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीमध्ये 11 पैकी 11 उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी झालेले आहेत. विजयी उमेदवारामध्ये वार्ड एक मधून अनिल दिनकर राठोड, शितल अंतेश्वर जाधव, वार्ड दोन मधून कमलाबाई राजेंद्र भोजने, विठ्ठल व्यंकट टोकले,रेखा राम कांबळे वार्ड तीन मधून रोहित विठ्ठलराव पाटील, हरीवंदाबाई अरविंद घारूळे, मंगलबाई सोपान कारीकंटे, तर वार्ड चार मधून प्रभू मनोहर पवार,आशाबाई विठ्ठल टोकले, नामदेव गोविंद कांबळे आदींचा समावेश आहे. या विजयी उमेदवारांचा सत्कार भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी भाजपा युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांची उपस्थिती होती.
पती-पत्नीची विजयी हॅट्रिक
निलंगा तालुक्यातील गौर ग्रामपंचातीअंतर्गत भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते रोहित विठ्ठलराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली गौर ग्रामविकास पॅनल व विरोधी पॅनलमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत 11 पैकी 11 जागा जिंकून गौर ग्रामविकास पॅनलच्या उमेदवाराने विजय मिळविला आहे. यामध्ये रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या विकास कामाची पावती म्हणून विठ्ठल टोकले व आशा टोकले या पती-पत्नीला मतदाराने तिसर्यांदा प्रचंड मताधिक्य देवून विजयी केलेले आहे. या निवडणुकीतील पॅनलच्या एकतर्फी विजयामुळे गौर ग्रामविकास पॅनलचे सर्वत्र कौतुक होत आहे.