आपल्या परिसरातील पुरूष व्यक्ती बेपत्ता असल्यास पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा

आपल्या परिसरातील पुरूष व्यक्ती बेपत्ता असल्यास पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा

लातूर (प्रतिनिधी) : दि. 4 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 5-45 वाजण्याचे पूर्वी कसबे तडवळा शिवारात आश्रुबा राजेंद्र मिसाळ रा. कोबडवाडा यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीमध्ये एक अनोळखी पुरूष वय अंदाजे 40 ते 45 वयाचे प्रेत कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणवरून कमरेला भायीचे शर्ट चे सहायाने दगड बांधून त्यांचे पाय नॉयलॉन बंधनाने बांधून विहिरीतील पाण्यात टाकून दिले ते पाण्याने सडून कुजलेले मिळूण आले आहे.

यावरून पो.हे.कॉ.581 जी.वाय.गुजकर पो.स्टे.ढोकी यांनी सरकार तर्फे फिर्यादा दिल्याने वरील प्रमाणे गुन्हा दाखल आहे.एकंदरीत मयताचे व घटनास्थळाचे परिस्थितीवरून सदरचे अनोळखी पुरूषास कोणीतरी अज्ञात कारणावरून अज्ञात हत्याराने मारून त्याचा खुन करून त्याचे कमरेला दगड बांधून दिनांक 4 डिसेंबर 2020 रोजीचे सकाळी 5-45 वाजता चे पूर्वी विहिरीतील पाण्यात टाकूण पुरावा नष्ट केला आहे.

अनोळखी मृत्यू व्यक्तीचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे:-सदर मयताचे वय अंदाजे40 ते 45 वर्ष,उंची 5 फुट 5 इंच ,पॅन्ट काळया रंगाची शर्ट पांढरे रंगाचा ॲक्शन कंपनीचा,अंडरविअर किलर कंपनीची,बनियन चॉकलेटी रंगाचे,डाव्या हातावर इंग्रजीत एस. जे. असे लिहलेले,उजव्या हातावर अवि किंवा अभी नाव गोदलेले स्पष्ट दिसून येत नाही.अशा वर्णनाचे वस्तू प्रेताचे अंगावर मिळूण आल्या आहेत.

आपल्या परिसरात, गावात वरिल वर्णनाचा पुरूष बेपत्ता अथवा हरावला असल्यास पुढील नमुद मोबाईल नंबरवर संपर्क करण्यात यावा, नियंत्रण कक्ष उस्मानाबाद-02472/222700 पोलीस स्टेशन, ढोकी-02472/232033,उपविभागीय पोलीस अधिकारी शशीकिरण काशिद मो. क्र. 7588465052 उप विभाग कळंब, सहाय पोलीस निरिक्षक एस. एस.बनसोडे मो.क्र. 9921771400 पोलीस स्टेशन ढोकी, पोलीस उपनिरिक्षक के. एस. बुध्देवार मो. क्र. 9970732468 पोलीस स्टेशन ढोकी.

About The Author

error: Content is protected !!