प्रदेश काँग्रेस चे निरीक्षक जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीसाठी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर
23 व 24 जानेवारी रोजी प्रदेश काँग्रेस निरीक्षक जितेंद्र देहाडे, धीरज पाटील संवाद साधणार
लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील चाकुर, जळकोट, देवणी, शिरूर अनंतपाळ येथील नगरपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने जोरदार तयारी सुरू केली असून त्यादृष्टीने प्रदेश काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात राज्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री पालकमंत्री अमित विलासराव देशमुख, राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या सूचनेनुसार प्रदेश काँग्रेस कमिटीचे निरीक्षक जितेंद्र देहाडे व धीरज पाटील हे जिल्यातील नगरपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने केलेल्या कामाचा आढावा व स्थानीक काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते याच्याशी संवाद साधणार आहेत अशी माहिती जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांनी दिली आहे.
त्यानूसार प्रदेश काँग्रेस कमिटीचे निरिक्षक जितेंद्र देहाडे हे 23 जानेवारी रोजी सकाळी शनिवारी 10.30 वाजता जळकोट तेथे नगरपंचायत निवडणुकी च्या दृष्टीकोनातून उपस्थित कॉंग्रेसचे पदाधिकारी नगरसेवक कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधणार आहेत तर दुपारी तीन वाजता देवणी येथे नगरपंचायत निवडणुक संदर्भात स्थानीक काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते याच्याशी संवाद साधणार आहेत 24 जानेवारी रोजी प्रदेश निरीक्षक धीरज पाटील हे चाकुर तेथे 10.30 वाजता नगरपंचायत निवडणुकी चा आढावा घेतील तर दुपारी तीन वाजता शिरूर अनंतपाळ येथील नगरपंचायत निवडणुकी चा आढावा घेऊन काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते संवाद साधणार आहेत.
या संवाद बैठकीत जिल्हा काँग्रेस ने नियुक्त केलेले स्थानीक नगरपंचायत निवडणुक २०२१ चे निरीक्षक , समन्वयक, तालुका अध्यक्ष, शहर काँग्रेस अध्यक्ष या बैठकीला उपस्थित राहतील या संवाद बैठकीस काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आवाहन लातूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांनी केले आहे.