औंध परिसरातील सावकार चतुर्श्रुंगी पोलिसांनच्या जाळ्यात, 5 कोटीच्या प्रकरणात नाना वाळके सह दोघांना अटक

औंध परिसरातील सावकार चतुर्श्रुंगी पोलिसांनच्या जाळ्यात, 5 कोटीच्या प्रकरणात नाना वाळके सह दोघांना अटक

पुणे : बालेवाडी येथील एका ३५ वर्षाच्या व्यावसायिकाला व अनेकांना पैसे देऊन त्यांच्याकडून भरमसाट व्याजाची मागणी करुन धमकाविणार्‍या आणखी दोन व्यक्तीवर चतु:श्रृंगी पोलिसांनी सावकारी प्रकरणी कारवाई करुन अटक केली आहे.रामदास ऊर्फ नाना गोपीनाथ वाळके (वय ३७ रा. जय गणेशनगर, विधातेवस्ती, औंध) आणि त्याचा साथीदार अनिकेत रमेश हजारे (वय ३८, रा. हजारे सदन, दापोडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.हा प्रकार ऑगस्ट २०१५ ते १० डिसेंबर २०२१ दरम्यान घडली आहे.याप्रकरणी बालेवाडी येथील एका ३५ वर्षाच्या व्यावसायिकाने चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी नाना वाळके याच्याकडून ३ कोटी ५० हजार रुपये घेतले होते. या रक्कमेच्या मोबदल्यात फिर्यादी यांनी अनिकेत हजारे यांच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये बँकेद्वारे ३ कोटी २ लाख २७ हजार रुपये व रोखीने २ कोटी ७ लाख ७३ हजार रुपये असे एकूण ५ कोटी १० लाख रुपये परत केले आहेत. असे असतानाही अनिकेत हजारे याने फिर्यादीच्या नावावर असलेल्या गाड्यांचे आर सी बुक, चेक घेतले. तसेच त्यांच्याकडून बळजबरीने प्रॉमिसरी नोट लिहून घेतली.फिर्यादी यांच्याविरुद्ध खोट्या बातम्या प्रकाशित केल्या. शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी यांच्याकडे ४ कोटी ७५ हजार रुपयांची मागणी केली. त्यावर नाना वाळके यांनी फिर्यादी यांना तू अनिकेत हजारे याला पैसे देऊन विषय संपव. नाही तर तो इतर लोकांना एकत्र आणून तुझ्याविरुद्ध १० ते १५ खोट्या तक्रारी दाखल करीन, तुझा गेम टाकायला कमी करणार नाही. स्वत:चा व कुटुंबाचा विचार कर, अशी धमकी देऊन फिर्यादीची आर्थिक पिळवणूक केली. या प्रकारानंतर फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेतली. चतु:श्रृंगी पोलिसांनी खंडणी व सावकारी अधिनियमाखाली गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. यातील आरोपी क्र .१ याचेवर यापूर्वी ०४ गुन्हे दाखल आहेत व आरोपी क्र .२ याचेवर १ गुन्हा दाखल आहे . सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता ,सह पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे ,अपर पोलीस आयुक्त ( गुन्हे ) , रामनाथ पोकळे ,पोलीस उपआयुक्त ( गुन्हे ) , श्रीनिवास घाडगे ,सहा. पोलीस आयुक्त , गुन्हे -१ , पुणे शहर , लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक – २ कडील पोलीस निरीक्षक , बालाजी पांढरे , पोलीस उपनिरीक्षक , श्रीकांत चव्हाण व पोलीस अंमलद विजय गुरव , प्रदिप शितोळे , शैलेश सुर्वे , विनोद साळुंके , राहुल उत्तरकर , संग्राम शिनगारे , सैदोबा भोजराव , सचिन अहिवळे , अमोल पिलाने , प्रविण पडवळ , चेतन शिरोळकर , प्रदिप गाडे , मोहन येलपल्ले , रुपाली कर्णवर , आशा कोळेकर यांनी केलेली आहे .व चतु:श्रृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचौरे पुढील तपास करत आहे.

About The Author