अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करणाऱ्या खाजगी शिकवणी संचालका विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करणाऱ्या खाजगी शिकवणी संचालका विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद; घटनेने खाजगी शिकवणी चालकाचे धाबे दणाणले

लातूर (प्रतिनिधी) : संपुर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक पॅटर्न चा दबदबा निर्माण करणाऱ्या लातूर पॅटर्न ची ओळख निर्माण झाली आहे. शिक्षणासाठी लातूर कडे हजारोंच्या संख्येने परराज्यातून, पर जिल्ह्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओढा हा फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परंतु याच शैक्षणिक पॅटर्न ला काळीमा फासणारी घटना घडली आहे. लातूर शहरातील उद्योग भवन/ ट्युशन एरिया परिसरात आठवी, नववी, दहावी सायन्स शिकवणारे मामाडगे सायन्स क्लासेस चे संचालक मामाडगे यांनी मुलीशी गैरवर्तन केल्या प्रकरणी सदरील क्लासेस संचालका विरोधात शिवाजी नगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे खाजगी शिकवणी चालकाचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करणाऱ्या खाजगी शिकवणी संचालका विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

सविस्तर माहिती अशी की, लातूर शहरातील ट्युशन एरिया म्हणून प्रचलित असलेल्या उद्योग भवन परिसरात इयत्ता आठवी, नववी, दहावी चे मामडगे सायन्स क्लासेस आहे. दि.26 डिसेंबर रोजी मामडगे सायन्स क्लासेस चे संचालक किशोर मामडगे या शिक्षकाने पिडित मुलीला आपल्या ऑफिस मध्ये बोलून तू अभ्यास व्यवस्थीत करत जा, तू मास्क का लावतेस, बिना मास्क ची चांगली दिसतेस, दररोज माझ्या क्लासमध्ये मास्क काढून बसत जा, क्लास सुरू होण्याच्या पंधरा मिनिटे आगोदर व क्लास सुटल्यानंतर पंधरा मिनिटे येऊन मला भेटत जा, तु मला आवडतेस,मी तुला आवडत नाही का ?असे म्हणून ऑफिस चा दरवाजा लावण्यास सांगितले. तसेच यापुर्वीही वाईट उद्देशाने गालाला हात लावून गाल ओढला तसेच गालाला केक लावला असल्याचे फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीतमध्ये नमूद करण्यात आले आहे. या फिर्यादी वरुन दि 30 डिसेंबर बुधवार रोजी रात्री उशिरा शिवाजी नगर पोलीस ठाणे याठिकाणी संचालक किशोर मामडगे याच्या विरुध्द गरनं 530/2021 कलम 354 (A) (1)(4) भा दं वी, पोक्सो 12 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर इसमास अटक ही करण्यात आली आहे. पुढील तपास हा शिवाजी नगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक डी एस डोलारे, तपास अधिकारी एस आर देशमुख, सपोनि दयानंद पाटील तसेच आदी कर्मचारी हे करत आहेत.

About The Author