दयानंद कॉलेज ऑफ फार्मसीत आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ

दयानंद कॉलेज ऑफ फार्मसीत आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ

लातूर (प्रतिनिधी) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व दयानंद कॉलेज ऑफ फार्मसी, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३१ डिसेंबर रोजी अ विभाग आंतरमहाविद्यालयीन मुलांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव रमेश बियाणी यांच्या हस्ते स करण्यात आले यावेळी दयानंद शिक्षण संस्थेचे सदस्य अजिंक्यजी सोनवणे व फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.क्रांती सातपुते, विद्यापीठाचे बी.ओ.एस.मेंबर, डॉ.भास्कर रेड्डी, डॉ.महेश बेंबडे, महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा.ऋषी मस्के यांची प्रमुख उपस्थिती होती.

या स्पर्धेमध्ये विविध १३ महाविद्यालयीन संघानी सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेतील प्रथम सामन्यात दयानंद कॉलेज ऑफ फार्मसी च्या संघाने विजय नोंदवून स्पर्धा शृंखलेचा प्रारंभ केला. या प्रसंगी महाविद्यालयीन विद्यार्थी व प्राध्यपक वृन्द यांची उपस्थिती होती. या स्पर्धेतील सहभागी संघ व खेळाडूंना दयानंद शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरविंदराव सोनवणे, ललितकुमार शहा, रमेश राठी, सहसचिव सुरेश जैन, कोषाध्यक्ष संजय बोरा यांनी शुभेच्छा दिल्या.

About The Author

error: Content is protected !!