विद्यापीठाचे स्वातंत्र्य हिरावणारा काळा कायदा रद्द करा

विद्यापीठाचे स्वातंत्र्य हिरावणारा काळा कायदा रद्द करा

लातूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर भाजपा युवा मोचार्ची निदर्शने

लातूर (प्रतिनिधी) : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने नवीन विद्यापीठाचा कायदा घाईन पारीत केला आहे. यामुळे विद्यापीठाच्या कामात उच्च शिक्षण मंत्र्याचा राजकीय हस्तेक्षेप वाढणार आहे. शिक्षण मंत्र्यांना प्र.कुलपतीचा दर्जा देऊन राज्यपालाच्या निरपेक्ष अधिकारावर घाला घालण्याचे काम राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केलेले आहे. आता विद्यापीठाच्या पवित्र क्षेत्रातही राजकारण घुसणार असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे शासनाने विद्यापीठाचे स्वातंत्र्य हिरावणारा काळा कायदा तात्काळ रद्द करा अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागेल. असा ईशारा भाजपा नेते तथा भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील निदर्शने आंदोलनात दिलेला आहे. भाजपा युवा मोर्च्याचे प्रदेशाध्यक्ष विक्रांतदादा पाटील, राज्याचे माजी कामगार कल्याण मंत्री संभाजीराव पाटील, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे यांच्या सूचनेनुसार भाजपा युवा नेते यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात भाजपा युवा मोर्चा शहर जिल्ह्याच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

यावेळी बोलताना युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर म्हणाले की, राज्य शासनाने नवीन विद्यापीठ कायदा महाविकास आघाडीने बहूमताच्या जोरावर गोंधळातच मंजूर करून घेतला. परंतु घाईघाईने घेतलेला निर्णय तत्काळ शासनाने संमत करू नये संयुक्‍त चिकीत्सा समितीकडे हा कायदा पाठवावा व मार्चमध्ये होणार्‍या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर करावा. नवीन विद्यापीठाच्या स्वायत्तेवर घाला येणार आहे. किंबहुना विद्यापीठ नव्हे तर ही विद्यापीठे सरकारी महामंडळे व्हायला वेळ लागणार नाही. विद्यापीठाच्या निविदामध्ये या कायद्यामुळे राजकीय हस्तक्षेप वाढणार असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होणार आहे. या कायद्यामुळे खर्‍या अर्थाने विद्यापीठाचे स्वातंत्र्य हिरावण्याचे काम या सत्ताधारी शासनाने केलेले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता व विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ मांंडण्याचा प्रकार शासनाने सुरू केलेला आहे. विद्यापीठे ही कुण्या राजकीय पक्षाची मक्‍तेदारी नाही. त्यामुळे या विद्यापीठाच्या पवित्र क्षेत्रात राजकारण येऊ नये. अशी अपेक्षाही युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी व्यक्‍त केली.

यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अ‍ॅड.गणेश गोमचाळे, शहर जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड.गणेश गोजमगुंडे, सागर घोडके, संतोषसिंह ठाकूर, उपाध्यक्ष वैभव डोंगरे, गजेंद्र बोकन, शंभूराजे पवार, अ‍ॅड.हरीकेश पांचाळ, संतोष जाधव, प्रतिक बेरकिले, आकाश मसाने, पंकज देशपांडे, संतोष तिवारी, व्यंकटेश हांगरगे, सुनिल राठी, राहूल भूतडा, पूनम पांचाळ, पांडूरंग बोडके, गोविंद सूर्यवंशी, नहुश पाटील, चैतन्य फिस्के, राजेश पवार, काकासाहेब चौगुले, प्रेम मोहिते, ईश्‍वर सातपूते, महादेव पवार, परमेश्‍वर स्वामी, शूभम स्वामी, नितीन नारगुडे, प्रमोद जाधव, अक्षय शिंदे, राहूल औसे, गणेश खाडप, यशवंत कदम, इम्रान शेख, मयुर भोसले, नितीन शेटकार, अतीश शिंदे यांच्यासह भाजपा युवा मोर्चा व विद्यार्थी आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आंदोनालाच्या प्रारंभी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सत्ताधारी शासनाच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली.

राज्यपालाचे अधिकार कमी करण्याचा डाव

देशातील सर्व विद्यापीठांना अधिक स्वायत्ता देण्याच्या तरतूदी होत असताना महाराष्ट्र राज्याच्या प्रवास मात्र उलट्या दिशेने सुरू आहे. विद्यापीठ कायद्यात 2016 मध्ये एकमताने बदल केले व विद्यापीठे राजकारणापासून दूर राहतील. असा विचार केला होता. परंतु या कायद्याने शिक्षणमंत्र्यांना कुलपती करून राज्यपालाचे अधिकार कमी करण्याचा डाव आहे.  यामुळे विद्यापीठाचे दैनंदिन कामकाज, निविदा, नियुक्त्या व अन्य बाबीमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढून विद्यापीठे ही राजकारणाचे आड्डे बनतील अशी भीतीही भाजपा युवा नेते तथा भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी यावेळी बोलताना व्यक्‍त केली.

About The Author