ट्युशन चालकाकडून विद्यार्थिनीवर झालेला अत्याचार ही अत्यंत दुर्दैवी व गंभीर बाब – रवि सुर्यवंशी

ट्युशन चालकाकडून विद्यार्थिनीवर झालेला अत्याचार ही अत्यंत दुर्दैवी व गंभीर बाब - रवि सुर्यवंशी

कडक निर्बंध घाला अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायदा हातात घेणार

लातूर (प्रतिनिधी) : लातूर येथील नामवंत ट्युशन संचालक किशोर मामडगे यांचे लातूरच्या उद्योग भवन ट्युशन एरिया परिसर येथे 8 ते 10 पर्यंतचे मामडगे सायन्स क्लासेस बऱ्याच वर्षापासून क्लासेस घेत आहेत. परंतु दि. 26 डिसेंबर 2021 रोजी दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास किशोर मामडगे यांनी अल्पवयीन विद्यार्थीनीवर अन्याय अत्याचार केल्याची घटना लातूर शहरात घडली अशी तक्रार पिडीत मुलीच्या आईने शिवाजी नगर पोलिस ठाणे येथे दिली आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी व गंभीर असून लातूर च्या शैक्षणिक क्षेत्राला काळीमा फासणारी आहे अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव रवि सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

ट्युशन चालकाकडून विद्यार्थिनीवर झालेला अत्याचार ही अत्यंत दुर्दैवी व गंभीर बाब - रवि सुर्यवंशी

लातूरची ओळख शिक्षणाचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे. ही ओळख पुसण्याचा प्रयत्न काही ट्यूशन चालकाकडून होत असेल तर अत्यंत लाजिरवाणी व दुर्दैवी बाब आहे. यापुढे पालकांनी विद्यार्थ्यांचे ट्युशन मध्ये ऍडमिशन करत असताना मुला-मुलींच्या सुरक्षितता म्हणून संचालकांकडून हमीपत्र घ्यावे तसेच प्रशासनाने सर्व ट्युशन चालकांवरती सुरक्षेच्या बाबतीत निर्बंध घालावेत व गोरगरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण अवाजवी फी मुळे घेणे खूप अवघड झाले असून ट्यूशन चालकाचा सर्व मनमानी कारभार चालू असून याला लगाम लावला पाहिजे. या खाजगी ट्युशन चालकांवरती प्रशासनाचा कसल्याच प्रकारचा अंकुश राहिलेला नाही या ट्यूशन चालकावर कडक निर्बंध घालावेत अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना येणाऱ्या काळात कायदा हातात घेतल्या व त्यांच्या विरोधात आवाज उठवल्या शिवाय शांत बसणार नाही. तसेच झालेल्या घटनेसंदर्भात महाराष्ट्र निर्माण सेना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार देऊन अशा प्रकारचे गैरवर्तन पुन्हा होणार नाही म्हणून सर्व मनमानी करणार्या ट्यूशन चालकावर निर्बंध घालण्यात यावेत अशी मागणी करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत मनसे जिल्हा सचिव रवि सुर्यवंशी यांनी दिली आहे. या पत्रकार परिषदेप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष किरण चव्हाण, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष भागवत शिंदे, शहराध्यक्ष मनोज अभंगे, कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अंकुश शिंदे आदी उपस्थित होते.

About The Author