शेतकरी संघटनेच्या इशाऱ्यानंतर बडूर येथील खंडित वीजपुरवठा चालू
निलंगा (प्रतिनिधी) : गेल्या पंधरा दिवसांपासून बिल वसुलीसाठी बडूर ता.निलंगा गावातील शेती पंपाचा विजपुरवठा महावितरणने खंडित केला होता. पिकांना व जनावरांना पाणी देण्यासाठी अडचण होती. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होते. या बाबत शेतकऱ्यांनी संघटनेशी संपर्क साधून विजपुरवठा चालू करण्याची विनंती केल्यानंतर शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके यांनी निलंगा येथील महावितरण कार्यालयात शेतकऱ्यांसह जावून ही विज बील वसुली बेकायदेशीर असून शेतकरी महावितरणचे देणे लागत नाही. आधी २४ तास उच्च दाबाचा विजपुरवठा करा, आजपर्यंत केलेली विज बिल आकारणी चुकीची असुन ती दुरुस्त करा नंतर कोण कोणाचे देणे लागतंते बघू असे सांगून विजपुरवठा चालू नाही केल्यास तिव्र आंदोलन करु असा इशारा दिल्यानंतर महावितरणचे कार्यकारी अभियंता यांनी लगेच विजपुरवठा चालू करण्याचे आश्वासन दिले. यावेळी कार्याध्यक्ष बालाजी जाधव, उपाध्यक्ष करण भोसले, दत्तात्रय पाटील, अजिंक्य पाटील, गोपाळ होळकर, मल्लीनाथ कात्रे, महारुद्र स्वामी, बालाजी बंडे,भरत बुदके, तुकाराम सुर्यवंशी, शिवाजी हजारे, कमलाकर वाघे, संदिपान वाघमारे, बाळासाहेब उमाटे, शंकर पाटील, अविनाश मडुळे, गुंडु हासुरे, एकनाथ वाघमारे, आदिंसह शेतकरी उपस्थित होते.