ॲड. किरण जाधव यांच्या हस्ते संजय गांधी निराधार योजना समाधान शिबिराचा शुभारंभ

ॲड. किरण जाधव यांच्या हस्ते संजय गांधी निराधार योजना समाधान शिबिराचा शुभारंभ

लातूर (प्रतिनिधी) : लातूर शहरात प्रभागनिहाय संजय गांधी निराधार योजना समाधान शिबिराचे आयोजन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित देशमुख यांच्या सूचनेनुसार करण्यात येत आहे. या शिबिराला पात्र लाभार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दि. १ जानेवारी वार शनिवार रोजी सकाळी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव यांच्या हस्ते लातूर शहरातील प्रभाग क्रमांक १५ मधील नारायण नगर येथील आर्य समाज चौकात संजय गांधी निराधार योजना समाधान शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी संजय गांधी निराधार योजना समिती लातूर शहरचे चेअरमन हकीमभाई शेख, प्राचार्य डी. एन. केंद्रे, दगडूआप्पा मिटकरी, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी व्हा. चेअरमन पृथ्वीराज शिरसाठ, काँग्रेसचे पदाधिकारी संजय नीलेगावकर, महानगरपालिकेचे माजी सभापती तथा लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्रा. राजकुमार जाधव, ॲड. फारुक शेख, नगरसेवक इम्रान सय्यद, प्रदीप चिद्रे, संजय सूर्यवंशी, अकबर माडजे, विजय धन्ना, श्रीदेवी औसे, संगीता मोळवणे, शिवा औसे, राजू चिंताले, मनोज देशमुख, अमोल माने, पंकज देशमुख, जनसंपर्क अधिकारी पांडूरंग कोळगे, दीपक शिवपुजे, हमजा पटेल, खाजा पाशा, कैफ काजी, महमद बिलाल, कार्यालयीन प्रभाग समन्वयक गोविंद जोशी आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथप्रमुख, तहसीलचे कर्मचारी, निराधार महिला पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author