ग्रामपंचायतीच्या लोकसहभागातून जवळगा जिल्हा परिषद शाळेचा कायापालट
देवणी (प्रतिनिधी) : तालुक्यातील जवळगा शाळेत गुणवत्तेसोबत शाळेची इमारत ही बोलकी करून जवळगा प्रशाला बाला उपक्रमाने नटत आहे ,लातूर जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे विद्यार्थ्यांना विषयाचे संपूर्ण ज्ञान होऊन प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत व्हावा हे बाला उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. इमारतीला आधार देणारे खांब (पीलर) आता ज्ञान देणारे स्तंभ झाले आहेत भिंती विविध उपक्रम, चित्रे, नकाशा, डॉटबॉर्ड, सुविचार,म्हणी, विद्यार्थ्यांना लिहण्यासाठीचे फलक, उंची मोजण्याचे साधन, या आणि अशा विविध बाबींनी सजली आहे,जवळगा प्रशालेची स्थापना वर्ष १९५१ची असून एकूण १२शिक्षक कार्यरत तर शाळेचा पट ३३८ आहे
प्रशालेत LED प्रोजेक्टर व smart TV चा व ICT-LAB चा E- learning साठी वापर केला जातो, दैनिक परिपाठमध्ये विद्यार्थी वाढदिवस हा भेटवस्तू देऊन नियमित साजरा केला जातो.
सदरील शाळाही १९५१ चे असल्यामुळे या शाळेत पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग भरतात गुणवत्तेमुळे खाजगी शाळांची स्तोम माजले असतानाही जिल्हा परिषद शाळे कडे विद्यार्थ्यांसह पालकांचा ओढा पाहून जवळगा ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन १५ व्या वित्त आयोगातून सुमारे दोन लक्ष ५० हजार रुपये खर्चून रंगरंगोटीची कामे करण्यात आली आहेत त्याच बरोबर आता विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी अद्यावत असे शौचालय उभारण्याचा प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्यात आला आहे त्यास मंजुरी मिळताच या बांधकामाची प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच हनुमंत बिरादार यांनी दिली,
पालक प्रतिक्रिया संजय गांधी निराधार कमिटीचे सदस्य यशवंत सोनकांबळे, बालाजी पाटोळे, सिंध्दार्थ पाटोळे,
जवळगा जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने किंवा शिक्षण विभागाच्या वतीने जलशुद्धीकरण यंत्र उभारण्यात यावे जेणेकरून विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळेल अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षण समितीचे यशवंत सोनकांबळे यांनी व्यक्त केली,
शिक्षक निधीतून अद्ययावत ग्रंथालय करण्याचे नियोजन असल्याचे मुख्याध्यापक श्री सुरेंद्र चौहान यांनी सांगितले तसेच सरपंच श्री हणमंत बिरादार व ग्रामसेवक विनोद खरात यांच्या पुढाकाराने बाला उपक्रमास गती मिळाली,तसेच शाळेस पालकांनी लोकवाटा निधी द्यावा असे मुख्याध्यापक ,शाळाव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ,सदस्य ,यांनी आवाहन केले आहे.