दयानंद कला महाविद्यालयामध्ये एड्स जनजागृती

दयानंद कला महाविद्यालयामध्ये एड्स जनजागृती

लातूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय सेवा योजना विभाग दयानंद कला महाविद्यालय, लातूर व कै.विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने एडस् जनजागृती कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते. या कार्यशाळेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.पी.गायकवाड व मार्गदर्शक डॉ. अरूणकुमार गवळे व लीला पांडे उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. अरूणकुमार गवळे यांनी महाविद्यालयातील तरूण विद्यार्थ्यांमध्ये एड्स जनजागृती करण्याची आवश्यकता सांगून PPT च्या माध्यमातून सर्व इतिहास सांगीतला. एड्स हा रोग आफ्रिकेतुन निर्माण झाला व तो सर्व देशांत नंतर पसरला. आज सर्व जगभर हा रोग पसरला आहे. मानवाने सर्व रोगांवर प्रतिबंधात्मक उपाय शोधून त्यांचा वेळोवेळी प्रतिबंध केला आहे. हा रोग होउ नये म्हणून घ्यावयाची काळजी, ज्यांनी संसर्ग झाला त्यांनी घ्यावयाची काळजी व त्यांच्यासाठी आरोग्य सेवा, या विषयी सविस्तर असे मार्गदर्शन करण्यात आले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एस.पी.गायकवाड यांनी लैंगिक समस्येसंदर्भात न लाजता चर्चा केली पाहिजे. महाविद्यालयातून लैंगिक शिक्षणही मोठया प्रमाणात दिले पाहिजे असे मत व्यक्त केले. या प्रसंगी 42 विद्यार्थ्यांची रक्त तपासणीही करण्यात आली.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रा.से.यो. स्वंयसेवकांनी उत्तम प्रतिसाद दिला व एड्स विषयक व्याख्यान संपन्न झाले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी एड्स चाचणी करून घेण्यातही चांगला सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सुनीता सांगोले यांनी केले, सुत्रसंचालन मेघराज शेवाळे तर आभार स्वंयसेवक भरत पवार यांनी मानले. राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य कार्यक्रमाधिकारी डॉ.सुभाष कदम, कार्यक्रमाधिकारी डॉ.सुनीता सांगोले, डॉ.मच्छिंद्र खंडागळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ.विलास कोमटवाड व स्वंयसेवक व स्वंयसेविका उपस्थित होते.

About The Author