दयानंद कला महाविद्यालयास अ.भा.गांधर्व मंडळाच्या संशोधन केंद्रास मान्यता

दयानंद कला महाविद्यालयास अ.भा.गांधर्व मंडळाच्या संशोधन केंद्रास मान्यता

लातूर (प्रतिनिधी) : अखिल भारतीय गांधर्व मांडळ,मुंबई यांच्या वतीने संगीताचार्य डॉक्टरेट ही पदवी दिली जाते. यासाठी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे अध्यक्ष पं. डॉ.विकास कशाळकर यांनी दयानंद कला महाविद्यालयास संशोधन केंद्रची मान्यता दिल्याचे सांगितले. तसेच संगीताचा प्रचार-प्रसार व्हावा, सांगितिक परिचर्चा संवाद कार्यक्रम आयोजित करावेत,कार्यशाळा व परिषदांचे आयोजन करता यावे यासाठी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ व दयानंद कला महाविद्यालय यांच्या अंतर्गत सामंजस्य करार झाला.

या संशोधन केंद्रामुळे व अंतर्गत सामंजस्य करारामुळे लातूरच्या सांस्कृतिक विकासात निश्चित भर पडणार आहे. संशोधन केंद्राची मान्यता व अंतर्गत सामंजस्य करार केल्याबद्दल अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे अध्यक्ष पं.डॉ. विकास कशाळकर,उपाध्यक्ष पं. पांडुरंग मुखडे, सचिव बालासाहेब सूर्यवंशी,मंडळाचे प्रबंध समितीचे सदस्य सुनील हुक्किरे यांचा दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड यांच्या हस्ते दयानंद कला महाविद्यालयात सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ.भा.गांधर्व महाविद्यालय मंडळाचे सचिव डॉ. देवेंद्र कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. संदीप जगदाळे यांनी केले. याप्रसंगी डॉ.सुनिता सांगोले, कार्यालयीन अधीक्षक नवनाथ भालेराव आदी उपस्थित होते.

About The Author