लातूर जिल्हा बँकेच्या वतीने पाच लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के दराने पिक कर्ज वाटप सुरू

लातूर जिल्हा बँकेच्या वतीने पाच लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के दराने पिक कर्ज वाटप सुरू

पाच लाख रुपये शून्य दराने पिक कर्ज देणारी लातूर बँक राज्यात पहिली

लातूर (प्रतिनिधी) : राज्यात अव्वल स्थानावर असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांना पाच लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के दराने कर्ज देण्याचा ऐतिहासिक निर्णय माजी मंत्री सहकार महर्षी तथा जिल्हा बँकेचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख यांनी सर्वसाधारण सभेत जाहीर केला होता त्या निर्णयाची अंमलबजावणी नूतन संचालक मंडळाने बैठकीत निर्णय घेतला असुन त्यानुसार पाच लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के दराने कर्ज पुरवठा वाटप सुरु करण्यात आला असल्याची माहिती लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी दिली आहे दरम्यान राज्यातील जिल्हा बँकात पाच लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के दराने लातूर जिल्हा बँक पहिली ठरली आहे.

राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकरी हा केंद्र बिंदू मानून वेळोवेळी शेतकऱ्यांना पतपुरवठा करण्याचे धोरण अवलंबिले असून यापूर्वी जिल्हा बँकेकडून तीन लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के दराने कर्ज पुरवठा जात होता आता पाच लाख रुपयांपर्यंत देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेवून शेतकरी सभासदांना आधार देण्याचे काम केले आहे यासाठी जिल्ह्यांतील प्राथमिक विविध कार्यकारी सेवा सोसायटी सभासदांना किसान क्रेडिट कार्ड योजने अंतर्गत नवीन पीक कर्ज दरानुसार पिक कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला असुन शेतकऱ्यांकडील ऊपलब्ध क्षेत्र तथा पिक पे ऱ्यानु सार सुरु/ पूर्व हंगामी ऊस व हरभरा पिकासाठी रूपये पाच लाख रुपयांपर्यंत मर्यादेस आधीन राहून कर्ज वाटप सुरु करण्यात आले आहे यांचा लाभ जिल्ह्यातील इच्छुक शेतकरी सभासदांनी चालु हंगामासाठी नविन उस लागवड तथा हरभरा पीक कर्ज मागणीसाठी नजीकच्या जिल्हा बँकेच्या शाखेत किंवा विविध कार्यकारी सोसायटी कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख, व्हॉईस चेअरमन अँड.प्रमोद जाधव व संचालक मंडळ यांनी केले आहे.

About The Author