अहमदपूर तालुक्यातील शिक्षक, कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून नोंदवला निषेध
अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना, महाराष्ट्र च्या वतीने ठाणे येथील घडामोडीनंतर आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून पुकारण्यात आलेल्या काळी फित आंदोलनास तालुक्यातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. शिक्षकांनी आपापल्या शाळेवर उपस्थित राहून काळ्या फिती लावून प्रशासनाच्या दडपशाहीचा निषेध नोंदवला. यात डी सी पी एस व एन पी एस धारक शिक्षकांसोबत जीपीएफ धारक शिक्षकांनीही सहभाग नोंदवत पाठींबा दिला.
१ नोव्हेंबर २००५ नंतर लागलेल्या शिक्षकांना नवीन परिभाषित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (NPS) लागू केली आहे. शासनाकडून एका दिवसात विधिमंडळ सदस्य व न्याय पालिकेतील कर्मचारी यांना जुनी पेन्शन लागू होऊ शकते तर शिक्षक व प्रशासनातील इतर कर्मचारी यांना का नाही? असा प्रश्नही या वेळेस उपस्थित करण्यात आला . जाणीवपुर्वक प्रशासन दडपशाही करत असल्याची भावना आंदोलन कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होत आहे. याचा निषेध करत दोन दिवस काळ्या फिती लावून काम केले जात आहे.मुंबई येथीलआझाद मैदानावरील नियोजित आंदोलन मार्चला ठाणे या ठिकाणी रोखूनआंदोलनाची धास्ती घेतली. यावरही प्रशासनाने मागण्या पुर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राज्य शिष्टमंडळ व जिल्हाध्यक्ष तानाजी सोमवंशी यांनी दिला आहे.
सदरील निषेध दिनास तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळला प्रत्येक जिल्हा परिषद, खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांनीही आपापल्या शाळेवर राहून काळ्या फिती लावून प्रशासनाचा निषेध नोंदवला.यात तालुक्यातील यशवंत शाळेतील मुख्याध्यापक व्ही.व्ही. गंपले,उपमुख्याध्यापक श्री कोंडलवाडे,पर्यवेक्षक उमाकांत नरडीले, दिलिप गुळवे.तसेच । म.रा.शि.प. तालुकाध्यक्ष श्रीधर लोहारे, गुरुअप्पा बावगे, महादेव खळुरे, प्रा शिवशंकर पाटिल,अजित लंजिले, शरद करकनाळे, गौरव चवंडा , हनुमंत सुडे, मुक्रम सय्यद, राम तत्तापुरे,धनवे,मुकनर, मेंडके, मोरे पी. कांबळे बी एन, गहिनीनाथ क्षिरसागर ,कनाके ,बोराळकर काळे, पदातुरे, मालवदे, सुनिल धनुरे, सूर्यवंशी, गिरी, सोमनाथ स्वामी, सौ. नागमणी हाळे, सौ. प्रतिभा सोलपुरे, सौ. मेघा देशमुख,श्रीमती वर्षा लगडे, सौ मिरजकर, सौ. आंधळे तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी निषेध नोंदवला.