अडीच लाखाचा गुटखा व वाहन जप्त

अडीच लाखाचा गुटखा व वाहन जप्त

अहमदपूर (गोविंद काळे) : शहरातील भाग्यनगर येथे राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला अडिच लाखाचा गुटखा व वाहन पोलिसांनी जप्त केले असून एकास अटक केली आहे. शहरातील भाग्यनगर येथे महिंद्रा कंपनीच्या बोलेरो पिक अप गाडीत गुटखा असल्याची गुप्त खबर मिळली पोलिसांना मिळाली. त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता १ लाख ८५ हजार रूपयांची किंमत असलेल्या एक्का गुटख्याच्या १३२५ पिशव्या, ८७५००रूपये किंमत असलेल्या गुलाम गुटख्याच्या ८७५ पिशव्या, १५००रूपये किंमतीची सुगंधित तंबाखू व २५०, ०००रूपये किंमतीचा बोलेरो पिक अप अशी ५ लाख २४ हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून अन्न व सुरक्षा अधिकारी दयानंद विठ्ठलराव पाटील यांच्या फिर्यादीवरून विनायक गोंड राहणार जांब (बु.) ता. मुखेड यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनील बिर्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक एकनाथ डक करीत आहेत.

About The Author