दयानंद कला महाविद्यालयास विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ठ ‘ओ’ दर्जा

दयानंद कला महाविद्यालयास विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ठ ‘ओ’ दर्जा

लातूर (प्रतिनिधी) : येथील सुप्रसिध्द असलेल्या दयानंद कला महाविद्यालयाचे  स्वामी रामनंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांने नुकतेच प्रशासकीय व शैक्षणिक कार्याचे मूल्यमापन करून सर्वोत्कृष्ठ ‘ओ’ दर्जा प्रदान केला आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा – 2016 नुसार महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयांचे प्रशासकीय व शैक्षणिक मूल्यमापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्या परिषदेने गठित केलेल्या समितीने महाविद्यालयाच्या एकूण सहा घटकांचे मूल्यमापन करून 560 पैकी 516 अर्थात 92.14% गुण दिले. यानुसार महाविद्यालयास सर्वोत्कृष्ठ ‘ओ’ दर्जा प्राप्त झालेला आहे. या यशाबद्दल महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने प्राचार्य डॉ. एस.पी. गायकवाड यांचा डॉ. शिवाजी जवळगेकर यांनी सत्कार केला. महाविद्यालयाने प्राप्त केलेल्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्था अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी, उपाध्यक्ष अरविंदराव सोनवणे, ललितभाई शाह, रमेशकुमार राठी, सचिव रमेशजी बियाणी, संयुक्त सचिव सुरेशजी जैन, कोषाध्यक्ष संजयजी बोरा, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी प्राचार्य डॉ. एस.पी.गायकवाड तसेच शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

About The Author