दहावी बोर्ड परीक्षेतील वाढीव गुण या विषयावर महादेव खळुरे यांचे आकाशवाणीवरून सुसंवाद
चित्रकला, लोककला, शास्त्रीय कला, क्रीडा, स्काऊट व गाईड, व एन.सी.सी. चे वाढीव गुण
अहमदपूर (गोविंद काळे) : यशवंत विद्यालय अहमदपूर येथिल कला शिक्षक महादेव खळुरे यांची एस एस सी (इ.10 वी)बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांना कला व क्रीडाप्रकारातील मिळणाऱ्या अतिरिक्त वाढीव गुणाबद्दलची माहिती या विषयावर आँल इंडिया रेडिओचे परभणी आकाशवाणी केंद्रावरुन मंगळवार दि.19 रोजी सायंकाळी 6:35 वाजता बालमंडळ या कार्यक्रमातून विद्यार्थी व पालकांशी सुसंवाद साधणार आहेत.कलेचा उपयोग त्यांच्या भविष्याच्या प्रगती पदासाठी होणे आवश्यक आहे. तसेच लोककला हे समाज प्रबोधनाचे माध्यम आहे लोककलेची वाढ व संवर्धन करण्याचे काम अनेक शालेय विद्यार्थी करीत असतात. अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इ.(10 वी) परीक्षेमध्ये क्रीडा गुणाच्या धर्तीवर शास्त्रीय कला चित्रकला क्षेत्रात प्रावीण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्यासंदर्भात शासन निर्णय घेतले आहे. चित्रकला,शास्त्रीय कला (गायन,वादन व नृत्य), बालनाट्य स्पर्धा, चित्रपट पुरस्कार, स्काऊट व गाईड, एन.सी.सी. या प्रकारात अतिरिक्त (वाढीव)गुण कशा प्रकारे दिले जाते.
या विषयावर व सर्व कला प्रकाराच्या वाढीव गुणाचे बोर्डाकडे प्रस्ताव कसे व कधी सादर करावे.तसेच इतर आवश्यक बाबीवर आकाशवाणी वरुन विषय निहाय सुसंवाद साधणार आहेत. कला शिक्षक महादेव खळुरे यांच्या आकाशवाणीवरील निवडीबद्दल संस्थेचे सचिव दलितमित्र,शिक्षणमहर्षी, डी.बी.लोहारे गुरुजी मुख्याध्यापक बालाजी बिरादार उपमुख्याध्यापक प्रेमचंद डांगे, पर्यवेक्षक उमाकांत नरडेले, रमाकांत कोंडलवाडे सहशिक्षक रामलिंग तत्तापुरे, राजकुमार पाटील,कपिल बिरादार,सतिश बैकरे,राजेंद्र कज्जेवाड,गौरव चवंडा,शरद करकनाळे आदिनी अभिनंदन व कौतुक केले.