मुलांची तस्करी: होमगार्डची सतर्कता. महीला ताब्यात!
कर्जत (रफिक शेख) : कर्जत मध्य रेल्वे पोलीसां सोबत असलेल्या होमगार्डच्या सतर्कतेमुळे नेरळच्या निर्माण नगरी भागातील चार मुलांची तस्करी टळली आहे चारही मुलानी आरडाओरडा केल्याने रेल्वे पोलीसांच्या नाकाबंदीवर असलेल्या पोलीस. होमगार्ड यांनी त्यातील महिलांना पकडण्यासाठी झडप टाकली यात ऐका महिलेला पकडण्यात यश आले असुन अन्य दोनमहिला मात्र पळुन गेल्या आहेत नेरळ रेल्वे स्थानकात फलाट एकच्या बाजूला निर्माण नगरी ही वस्ती आहे. त्पा भागातील मुलं खेळत असताना सायकळी ६ वा. काही मुलांची आरडा ओरड ऐकायला मिळाली त्यावेळी फलाट १ वर गस्तीवर असलेल्या चार मुलांची पळापळ पाहुन स्टेशनवर गस्त घालत असलेल्या रेल्वे पोलीस आणि होमगार्ड यांनी धावत जाऊन तेथे पाहण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी तेथुन अंधारा चा फायदा घेऊन दोन महिला पसार झाल्या मात्र मुलांना हाताला धरून नेणाऱ्या त्या महिलांनी मुलांना सोडुण पळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीसानी ऐका महिलेला पकडुन पोलीस चौकीत आणले त्यावेळी निर्माण नगरी मधील पालक देखिल नेरळ रेल्वे स्थानका वर पोहचले आणि त्यांनी आपल्या मुलां कडुन माहीती घेतली असता धक्काच बसला तीन अनोळखी महिला या चार मुलांना हाताला धरून नेत होत्या त्यावेळी दोन मुलांनी त्या महिलेचे हात झटकुन आरडा ओरडा केल्याने त्या चार मुलाची तस्करी रोखली गेली. निर्माण नगरी भागातील दक्ष विक्रम नैय्या, दिशा विक्रम नैय्या आणि खेळत असलेल्या दोन मुली यांची तस्करी टळली नेरळ रेल्वे पोलीसांनी मुलांच्या तस्करीचा प्रयत्न करणाऱ्या राजस्थान येथील कुसुम अशोक अहिर या महीलेला ताब्यात घेतले. त्यावेळी रेल्वे पोलीसांच्या पथकात सहाय्यक पोलीस निरिक्षक अतुल ठोंबरे. पोलीस कर्मचारी म्हस्के. देशमुख. सातपुते तसेच होमगार्ड म्हात्रे. महिला होमगार्ड सिंधु म्हात्रे भोपी यांनी त्या मुलांची तस्करी रोखण्यात यश मिळविले त्यानंतर रेल्वे पोलीसानी त्या महिलेला नेरळ ग्रामीण पोलीस ठाण्यात हस्तांतरीत केले.