महात्मा फुले महाविद्यालयात बालिका दिन व स्त्री शिक्षण दिन साजरा
अहमदपूर (गोविंद काळे) : स्त्रीशिक्षण, सत्यशोधक, समता, सामाजिक न्याय आणि वैज्ञानिक जाणिवाचे महत्त्व समाजाच्या सर्व थरांतील लोकांना पटवून देण्यासाठी आयुष्य पणाला लावणाऱ्या थोर समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिवस राष्ट्रीय बालिका दिन व स्त्री शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात आला.सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संतोष पाटील व युवराज मोरे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले तर आभार डॉ. बब्रुवान मोरे यांनी मानले. या वेळी प्रो. डॉ.एन.यु. मुळे, डॉ. प्रशांत बिरादार, प्रशांत डोंगळीकर यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येंने उपस्थित होते.