प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांचा वाढदिवस साजरा
सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव !
अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्रातील ख्यातनाम साहित्यिक, समीक्षक, पत्रकार व संशोधक – अभ्यासक महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांचा ५६ वा वाढदिवस येथील महात्मा फुले महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील विद्यार्थी, सर्व प्राध्यापक, कर्मचारी व पालक यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्याला सामाजिक कार्यकर्ते डॉ. सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी, कोमल डिझायनरचे प्रोप्रायटर शिवाजीराव सूर्यवंशी माजी विद्यार्थी वर्षा लगडे माळी , संजय पवार, सौ. कविता पवार, राहुल गायकवाड, प्रशांत बेले, समद पठाण, यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांच्या हस्ते शाल, तुळशीहार व ग्रंथ भेट देऊन प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील कर्मचारी वामन मलकापुरे यांच्या वतीने वाढदिवसानिमित्त महाविद्यालय परिसरात फटाक्यांची जल्लोषपूर्ण आतिषबाजी करण्यात आली.
यावेळी उपप्राचार्य डॉ. डी.डी. चौधरी, आई क्यू.ए.सी. प्रमुख डॉ. नागराज मुळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे, समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सतीश ससाणे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर, प्रो.डॉ. अनिल मुंढे, डॉ. मारोती कसाब, डॉ. प्रशांत बिरादार, डॉ. प्रकाश चौकटे, डॉ. दिगंबर माने, डॉ. सचिन गर्जे, प्रा. आतिश आकडे, ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे, कार्यालय प्रमुख प्रशांत डोंगळीकर, चंद्रकांत धुमाळे, वामनराव मलकापुरे, शिवाजी चोपडे, चंद्रकांत शिंपी,शेख हुसेन आदींनी उत्स्फूर्तपणे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांचा सत्कार करून अभीष्टचिंतन केले.