‘नॅक’ला सामोरे जातांना समयसूचकता आणि गुणवत्ता आवश्यक – प्राचार्य डॉ. एन.एस. धर्माधिकारी

'नॅक'ला सामोरे जातांना समयसूचकता आणि गुणवत्ता आवश्यक - प्राचार्य डॉ. एन.एस. धर्माधिकारी

अहमदपूर (गोविंद काळे) : महाविद्यालयाच्या गुणवत्तेत शुद्धता आणि योग्यता महत्वाची आहे. विद्यार्थ्याची गुणवत्ता कशी वाढेल असे उपक्रम राबविणे व तंत्रज्ञानाचा उपयोग करून महाविद्यालयाला डिजिटल करणे आवश्यक असल्याचे नमूद करून त्यासाठी समयसूचकता आणि गुणवत्ता अत्यंत महत्वाची आहे असे प्रतिपादन नॅक समिती व युजीसीचे सदस्य तथा प्राचार्य डॉ. एन.एस. धर्माधिकारी यांनी केले. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात आय. क्यू. ए. सी. विभागाच्या वतीने ‘नॅक मूल्यमापण समितीला सामोरे जातांना महाविद्यालयाचे गुणवत्ते संबंधी निकष ‘ या विषयावरआयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय नॅकच्या राष्ट्रीय कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर यावेळी नॅक समितीचे सदस्य तथा प्राचार्य डॉ. एन.एस. धर्माधिकारी, पुणे हे प्रमुख मार्गदर्शन म्हणून उपस्थित होते. पुढे बोलतांना प्राचार्य डॉ. धर्माधिकारी पुढे म्हणाले की, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार कार्य करणे आवश्यक असल्याचे ही ते म्हणाले. या कार्यशाळेचा अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केला. या कार्यशाळेचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्याचा परिचय नॅक चे समन्वयक उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी करून दिला. तर सूत्रसंचालन इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. ए. सी. आकडे यांनी तर संयोजक तथा आय. क्यू. ए. सी. चे समन्वयक प्रो. डॉ. एन. यु. मुळे यांनी आभार मानले.

About The Author