एमआयडीसी मधील हरीतपटटे महापालीके मार्फत विकसीत करावेत

एमआयडीसी मधील हरीतपटटे महापालीके मार्फत विकसीत करावेत

काँग्रेस पक्षाच्या वतीने एमआयडीसी व महापालिकेकडे निवेदनाद्वारे मागणी

लातूर (प्रतिनिधी) : लातूर एमआयडीसी मधील हरीतपटटे लातूर शहर महानगरपालीकेकडे हस्तातरीत करण्यात यावेत हे हरीतपटटे महापालीकेने योग्य पध्दतीने विकसीत करून मुळ उददेश साध्य करावा, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

लातूर एमआयडीसीसाठी जमीन संपादीत केल्या नंतर प्लॉट पाडतांना नियमानुसार हरीतपटटयासाठी खुल्या जागा सोडण्यात आल्या आहेत. अनेक वर्ष होवूनही या खुल्या जागा किंवा हरीतपटटे व्यवस्थीत विकसीत करण्यात आलेले नाहीत. एमआयडीसी परीसर आता महापालीका हाद्दीत आला असल्यामुळे तेथील हरीतपटटे लातूर शहर महापालीकेने विकसीत करणे अपेक्षित आहेत. त्यामुळे ते हरीतपटटे एमआयडीसीने लातूर महानगरपालीकेकडे हस्तात्तरीत करावेत अशी मागणी करणारे निवेदन काँग्रेस पक्षाच्या वतीने शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲड. किरण जाधव, महापालीकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते तथा विरोधी पक्षनेते ॲड. दिपक सुळ, नगरसेवक विजय साबदे यांच्या शिष्टमंडळाने एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी श्री मेघमाळे यांना दिले. त्यांनी या मागणीस सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

तसेच काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने लातूर शहर महानगरपालीका अमन मित्तल यांचीही भेट घेऊन एमआयडीसीकडून हरीतपटटे हस्तातरीत झाल्या नंतर ते नाविन्यपूर्ण पध्दतीने विकसीत करून शहराचे सौंदर्य वाढवावे अशी मागणी करणारे निवेदन त्यांना दिले आहे. लातूर एमआयडीसी लातूर शहर महानगरपालीकेच्या हददीत असल्यामुळे तेथील हरीतपटटे मनपाकडून विकसीत करण्यात येतील असे आश्वासन महानगरपालीका आयुक्तांनी दिले आहे.

About The Author