नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेचे राज्यस्तरीय दुसरे महाअधिवेशन 7 तारखेला होणार
अहमदपूर (गोविंद काळे) : नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेच्या वतीने व अँड केवल उके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राज्य सचिव वैभव गिते व सोलापूर जिल्ह्याच्या वतीने राज्यस्तरीय दुसऱ्या महाअधिवेशनचे आयोजन नातेपुते जि.सोलापूर येथील चैतन्य मंगल कार्यालय येथे दि.७ जानेवारी २०२२ रोजी करण्यात येणार आहे. या महा अधिवेशनाला अनेक मान्यवरांची उपस्थिती संपन्न होणार आहे. या राज्य स्तरीय दुसरे महाअधिवेशन व पुरस्कार सोहळा या कार्यक्रमाचे अध्यक्ष ना डॉ.नितिन राऊत ( ऊर्जामंत्री,उद्घाटक डॉ.सिरीवेल्ला प्रसाद (राष्ट्रीय सचिव,अखिल भारतीय कॉँग्रेस पक्ष तथा तामिळनाडू प्रभारी),दिप प्रज्वलन: मा.किशोर मेढे (सदस्य, राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग महाराष्ट्र),मार्गदर्शक: पद्मश्री डॉ.सुखदेव थोरात (माजी अध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोग),मा.सेल्वा पेरुंथागई (विद्यमान खासदार, श्रीरीपेरूमबुदूर (अ.जा.), कांचीपुरम, कॉँग्रेस पक्ष, तामिळनाडू ),स्वागताध्यक्ष ॲड. डॉ.केवल उके (राज्य महासचिव, नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टीज NDMJ महाराष्ट्र),निमंत्रक: मा. वैभव गिते (राज्य सचिव नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टीज NDMJ.महाराष्ट्र राज्य)आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
या राज्य स्तरीय अधिवेशनात सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते आंबेडकरी विचारांचे विचारवंत प्रविण मोरे हे विशेष सत्कार मुर्ती व पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या मध्ये पत्रकार, सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते, उद्योजक, डॉक्टर, वकील नामांकित कार्यकर्ते यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस ही संघटना अराजकीय, धर्मनिरपेक्ष सामाजिक संघटना असून दलित आदिवासी मानवाधिकार कार्यकर्ते, अत्याचार पीडित, शिक्षणतज्ञ व कायदे तज्ञ यांची सामाजिक चळवळ आहे. समता व बंधुता अबाधित राहण्याकरिता जातिभेद व मुख्यत्वे अस्पृश्यता निवारणावर व त्यावर आधारित हिंसा व अत्याचाराशी संबंधित विषयावर कायदेशीररित्या काम करून सामाजिक,आर्थिक,राजकीय,शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकाराची पाठराखण करून अनुसूचित जाती व जमाती समुदायाला न्याय देण्याचे प्रयत्न करते ही संघटना महाराष्ट्रासह भारतातील १८ राज्यात कार्यरत आहे.
नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस च्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील 25 वर्षांपासून ॲट्रॉसिटी कायदा आणि अनुसूचित जाती जमातींच्या अधिकारावर विविध उपक्रम, लॉंगमार्च, कार्यशाळा, परिषदा इत्यादींचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून चैतन्य मंगल कार्यालय, दहिगाव रोड, काळे पेट्रोल पंपा समोर, नातेपुते ता माळशिरस, जि. सोलापूर येथे दि. ७ जानेवारी २०२२ रोजी राज्यस्तरीय दुसरे महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या महामेळाव्यात संपूर्ण देशातून सामाजिक, राजकीय, प्रशासकीय, शैक्षणिक, न्यायालयीन, उद्योजकता, कला, पत्रकारिता व इतर क्षेत्रातील दिग्गज पुढारी व मान्यवर यांच्यासह जवळपास 3000 सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग असणार आहे.या महाअधिवेशनाचे आयोजन राज्य महासचिव ॲड.डॉ.केवल उके, राज्य सचिव वैभव गिते, राज्य सहसचिव पी.एस.खंडारे आणि राज्य प्रसिद्धीप्रमुख प्रमोद शिंदे व पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्ते यांच्या वतीने करण्यात आले आहे.तरी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहाण्याचे आव्हान संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.