लातूररोड ते नांदेड या रेल्वेमार्गासाठी सर्वपक्षीय बैठक संपन्न
सर्वांच्या सहकार्याने प्रश्नाला वाचा फोडणार
अहमदपूर (गोविंद काळे) : गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी असलेल्या लातूररोड ते नांदेड व्हाया चाकुर अहमदपुर लोहा सोनखेड हा नवीन रेल्वे मार्ग मंजूर व्हावा यासाठी येथील शासकीय विश्रामगृह येथे सर्व पक्षीय बैठक घेण्यात आली या बैठकीस नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. लातूररोड ते नांदेड एकशे चार किलोमीटर मध्ये दक्षिण उत्तर भारत जोडणारा, अविकसित भागाच्या विकासाला चालना देणारा, रेल्वेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवून देणारा, धार्मिक स्थळांना जोडणारा आपत्तीच्या काळात शासनाला मदत कारक होणारा महत्त्वपूर्ण मार्ग आहे. अशा या मार्गाच्या बैठकीसाठी खास अभ्यास असणारे रेल्वे संघर्ष समिती उदगीर चे सचिव बोर्डाचे माजी सदस्य मोतीलाल डोईजोड यांनी सखोल मार्गदर्शन करून या प्रश्नासाठी अहमदपुरकरांसोबत सदैव असल्याचे सांगितले, माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांनी या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी नांदेड लातूर जिल्ह्यातील सर्व खासदार आमदार सर्वपक्षीय नेते पत्रकार कार्यकर्ते यांना सोबत घेऊन राज्य आणि केंद्राची मदत घेऊन योग्य तो पाठपूरावा करणार असल्याची ग्वाही दिली.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवानंद हेगणे जिल्हा परिषद सदस्य माधवराव जाधव, माजी सभापती अॅङ टि. एन. कांबळे, नियोजन समितीचे सदस्य चंद्रकांत मद्दे, दलितमित्र उत्तम माने, प्रा.ङॉ.सय्यद अकबर, अॅड निखील कासनाळे, नगर परिषदेचे गटनेते ङाॅ.फूजल जाहगीरदार, नगरसेवक अभय मिरकले, बाळासाहेब आगलावे, रिपाई चे तालुकाध्यक्ष अरुणभाऊ वाघबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजहरभाई बागवान काँग्रेस शहराध्यक्ष विकास महाजन प्रा.शादुल पठाण आदींनी आपले विचार मांडले उपस्थित मान्यवरानी मौलीक सुचना कैल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार दिनकर मद्देवार यांनी केले तर आभार चंद्रशेखर भालेराव यांनी मानले ही बैठक यशस्वी करण्यासाठी दिनकर मद्देवाङ जय भुतङा प्रा ङाॅ.सय्यद अकबर, एन.ङी.राठोङ, चंद्रशेखर भालेराव अविनाश मंदाङे तानाजी राजे जावेद बागवान विकास राठोङ रवी मद्रेवार मेघराज गायकवाड यांनी परीश्रम घेतले.