तलवारीचा धाक दाखवून भंगार दुकानात चोरी

तलवारीचा धाक दाखवून भंगार दुकानात चोरी

पिंपरी (प्रकाश इंगवे) : भांडणाचा राग मनात धरून दोघांनी तलवारीच्या धाकाने भंगाराच्या दुकानातून पाच हजारांची रोकड जबरदस्तीने चोरून नेली. याप्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली. वेताळनगर, चिंचवड येथे रविवारी (दि. २) रात्री ही घटना घडली. तेजस उर्फ भैया नितीन वायदंडे (वय १९, रा. वेताळनगर झोपडपट्टी, चिंचवड), दिनेश महादेव इंगळे (वय २१, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) अशी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी शकील सलीम शेख (वय २४, रा. वेताळनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. रविवारी रात्री फिर्यादीच्या दुकानात आले. तलवारीचा धाक दाखवून आरोपींनी फिर्यादीच्या दुकानातील गल्ल्यातून पाच हजार रुपये रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली.

About The Author