बँक कर्मचाऱ्यांच्या खात्यावरुण चोरट्यांनी ६४ हजार ६०० रुपये लुटले

बँक कर्मचाऱ्यांच्या खात्यावरुण चोरट्यांनी ६४ हजार ६०० रुपये लुटले

पुणे (योगिता कोरे) : आपल्या बँक खात्याची माहिती, गोपनीय नंबर कोणाला सांगू नका असे बँका आणि पोलिसांकडून सातत्याने सांगितले जाते. असे असतानाही बँकेत काम करणारी एक महिला कर्मचारी ही बाब विसरली अन् सायबर चोरट्यांनी तिचे बँक खाते रिकामे करीत गंडा घातला. याप्रकरणी पिंपळे सौदागर येथे राहणाऱ्या एका ३४ वर्षांच्या महिलेने चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार गणेशखिंड रोडवरील अॅक्सिस बँकेत २५ ऑक्टोबर रोजी घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या अॅक्सिस बँकेत नोकरी करतात. त्यांनी २०२१ मध्ये नोकरी डॉट कॉमवर रजिस्ट्रेशन करून त्यांची पेड सर्व्हिस घेतली होती. त्याचे त्यांनी ४ हजार रुपये भरले होते. त्यांना २५ ऑक्टोबर रोजी एका फोन आला. चोरट्याने त्यांना आपण नोकरी डॉट कॉमवरून बोलत असल्याचे सांगितले. तुमचे पैसे रिटर्न करण्यात येत आहेत, असे सांगून त्यांच्या मोबाइलवर लिंक पाठविली. फिर्यादी यांना डेबिट कार्डची माहिती भरण्यास सांगितले. त्यांनी माहिती भरून पाठविली. त्याबरोबर त्यांच्या अॅक्सिस बँक खात्यातून सायबर चोरट्यांनी ६४ हजार ६०० रुपये काढून घेऊन फसवणूक केली आहे. त्यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज केला होता. त्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About The Author