पोलिसाने केला महिला वकिलावर बलात्कार!!

पोलिसाने केला महिला वकिलावर बलात्कार!!

पुणे (योगिता कोरे) : मेट्रोमोनियल साईटवर ओळख झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून एका पोलीस कॉन्स्टेबलने महिला वकिलाशी शरीरसंबंध ठेवून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी पोलीस कॉन्स्टेबलवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. लक्ष्मण गंगाधर राऊत (वय ३३, रा. पत्रा चाळ, पाषाण, मूळ रा. लोणी काळभोर) असे या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. तो सध्या पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या एटीएस सेलमध्ये कार्यरत आहे. याप्रकरणी एका २९ वर्षाच्या महिला वकिलाने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

About The Author

error: Content is protected !!