चौघांनी मध्यरात्री पादचाऱ्याला लुटले
पुणे (योगिता कोरे) : नववर्षाच्या मध्यरात्री शिवाजी रोडवर पादचाऱ्याला धमकावून लुटल्याची घटना घडली, चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत पादचारी जखमी झाला आहे. याप्रकरणी उमेश शिंदे (वय ४५, रा. शुक्रवार पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. म नववर्षाच्या मध्यरात्री दीडच्या सुमारास शिंदे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन ते घरी निघाले होते. दुचाकीवरून आलेल्या चौघांनी त्यांना न अडवले. शिंदे यांना मारहाण करून 7 चोरट्यांनी रस्त्यात पडलेला दगड ड त्यांना मारला. शिंदे यांच्या खिशातील मोबाइल तसेच रोकड असा साडेचौदा हजार रुपयांचा ऐवज लुटला. चोरीच्या न घटना वाढल्याने परिसरातील नागरिकांतून चिंता व्यक्त होत आहे.